काडीमोड घेतल्यानंतर टीव्ही अभिनेत्री दिलजीत कौरचे पालटले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 11:31 IST2017-03-16T06:00:03+5:302017-03-16T11:31:08+5:30

खासगी आयुष्यात घडणा-या घडामोडींचा व्यावसायिक जीवन आणि कामावर परिणाम होत असतो. मग ते सामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी. आपल्या ...

TV actress Diljeet Kaur's life changed after taking crores | काडीमोड घेतल्यानंतर टीव्ही अभिनेत्री दिलजीत कौरचे पालटले जीवन

काडीमोड घेतल्यानंतर टीव्ही अभिनेत्री दिलजीत कौरचे पालटले जीवन

सगी आयुष्यात घडणा-या घडामोडींचा व्यावसायिक जीवन आणि कामावर परिणाम होत असतो. मग ते सामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी. आपल्या वैयक्तिक जीवनातील काही घडामोडी अशा असतात की प्रसंगी त्यामुळे बरेच जण खचूनही जातात. मात्र त्यातले मोजकेच असे असतात की कठीण प्रसंगातूनही स्वतः खंबीर राहतात.पुन्हा आत्मविश्वासाने उभारी घेतात.कितीही अडचणी आल्या तरी त्याचा सामना करत भरारी घेण्याची ताकद स्वतःमध्ये ते निर्माण करतात.अशा मोजक्या व्यक्तींपैकी एक म्हणजे टीव्ही अभिनेत्री दिलजीत कौर.अभिनेता शालीन भानोत आणि दिलजीत कौर यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे.कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळाचा आरोप करत दिलजीतनं शालीनपासून काडीमोड घेतला.शालीननंही हे आरोप फेटाळून लावले होते.या सगळ्या कौटुंबिक कलहानंतर दिलजीत आणि शालीन वेगळे राहत आहेत.
 


कौटुंबिक जीवनात इतकं मोठं वादळ आल्यानंतर कुणीही खचून गेलं असतं.मात्र जीवनातल्या या प्रसंगाने अभिनेत्री दिलजीत कौर जराही खचली नाही. या काळाने आपल्याला आणखी खंबीर बनवलं असून आत्मविश्वास वाढल्याचं दिलजीतनं सांगितलं आहे. आयुष्यातील तो काळ आपल्यासाठी खरंच चांगला नव्हता असं दिलजीतनं म्हटलं आहे. मात्र या सगळ्या काळात निराश व्हायचे नाही. अडचणींचा नेटाने सामना करायचा असं ठरवल्याचं दिलजीतनं सांगितलं. तो कठीण काळ आता सरला आहे आणि आता आपण आनंदी, खंबीर असल्याचं दिलजीतने म्हटलंय. आपला मुलगासुद्धा आपल्याप्रमाणे खुश असून त्याच्या आनंदात माझा आनंद सामावला आहे. तो आनंदी असेल तर मी आनंदी आहे असं ती सांगते. तो एकदा हसला की आपण दहा वेळा हसतो असं सांगताना दिलजीतमधील आई भावुक झाली.हे सगळं प्रकरण दिलजीतला बरंच काही शिकवून गेलं आहे. काडीमोड घेतल्यानंतर दिलजीतने स्वतःचाही कायापालट केला आहे. मेकओव्हर करताना दिलजीतने जवळपास 25 किलो वजन कमी केले आहे. यामुळे आरशासमोर ज्यावेळी उभी राहते तेव्हा स्वतःला पाहून विश्वास बसत नसल्याचे दिलजीतनं म्हटलंय. स्वतःला आता आपण मेंटेन केले असून अगदी फिट वाटत असल्याचं समाधानही तिला लाभलं आहे. घटस्फोटानंतरची लढाई माझ्यासाठी मोठी होती. या लढाईतून नवीन आव्हाने पेलायला शिकल्याची भावना तिने व्यक्त केली आहे. 

Web Title: TV actress Diljeet Kaur's life changed after taking crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.