​या टिव्ही अभिनेत्याचे वडील होते रिक्षा ड्रायव्हर, स्वतःच्या हिंमतीवर आज त्याने मिळवला करोडोने पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 11:47 IST2018-01-31T06:17:17+5:302018-01-31T11:47:17+5:30

फैजल खान सगळ्यात पहिल्यांदा डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर २ या कार्यक्रमात झळकला होता. या कार्यक्रमाचे विजेतेपद त्याने मिळवले ...

This TV actor was the father of the autorickshaw driver, he earned today on his own hands. | ​या टिव्ही अभिनेत्याचे वडील होते रिक्षा ड्रायव्हर, स्वतःच्या हिंमतीवर आज त्याने मिळवला करोडोने पैसा

​या टिव्ही अभिनेत्याचे वडील होते रिक्षा ड्रायव्हर, स्वतःच्या हिंमतीवर आज त्याने मिळवला करोडोने पैसा

जल खान सगळ्यात पहिल्यांदा डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर २ या कार्यक्रमात झळकला होता. या कार्यक्रमाचे विजेतेपद त्याने मिळवले होते. या कार्यक्रमात त्याच्या नृत्याचे सगळ्यांनी कौतुक केले होते. फैजल हा अतिशय सामान्य घरातील होता. त्याचे वडील रिक्षा चालवत असत. पण त्याच्यात असलेल्या नृत्य कौशल्याने त्याला प्रचंड यश मिळवून दिले. या कार्यक्रमानंतर तो डान्स के सुपरस्टार या कार्यक्रमात झळकला. रिअॅलिटी शो मध्ये काम करत असतानाच फैजलला मालिकेत काम करण्याची ऑफर मिळाली. भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप, ये वादा रहा यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केले. त्याच्या अभिनयकौशल्याचे देखील प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले. आज तो छोट्या पडद्यावर चांगलाच स्थिरावला आहे.

faisal khan


फैजलने झलक दिखला जा, खतरों के खिलाडी यांसारख्या अनेक रिअॅलिटी शो मध्ये काम केले आहे. त्याने आज चांगलेच यश मिळवले आहे. पण इथपर्यंत पोहोचणे हे त्याच्यासाठी शक्य नव्हते. त्याची आर्थिक परिस्थिती ही बेताची होती. त्याचे वडील दिवसभर रिक्षा चालवून घर भागवत होते. रिक्षा चालवल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास देखील होत असे. पण घर चालवण्यासाठी त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. फैजलला मिळालेल्या प्रसिद्धीनंतर फैजलने घराचा भार आपल्या खांद्यावर उचलला आणि वडिलांना आराम दिला. तो वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षापासून घर चालवत आहे. आज त्याने चांगलाच पैसा मिळवला आहे. त्याने मुंबईतील एका खूप चांगल्या ठिकाणी वन बीएचके फ्लॅट घेतला आहे. तसेच त्याच्याकडे आज गाडी, बाईक देखील आहे. केवळ २० व्या वर्षी त्याने आज या सगळ्या गोष्टी मिळवल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्याचे वडील आज एका ह्युमन राइट्स ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांची ऑटो ही त्यांच्यासाठी खूप खास असल्याने त्यांनी आजही ती विकलेली नाही. त्या ऑटोमधून ते अनेकवेळा फैजलला घेऊन जातात. 

Also Read : ​हा अभिनेता दारुच्या गेला होता अधीन... रिहॅबिटेशन सेंटरमध्ये करावे लागले होते दाखल

Web Title: This TV actor was the father of the autorickshaw driver, he earned today on his own hands.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.