टीव्ही अभिनेता मुदित नायरनेही केले लग्न,असा होता दोघांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 15:38 IST2018-03-02T10:08:34+5:302018-03-02T15:38:34+5:30

कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक ...

TV Actor Mudit Nayar also made the marriage, that was the case of both | टीव्ही अभिनेता मुदित नायरनेही केले लग्न,असा होता दोघांचा अंदाज

टीव्ही अभिनेता मुदित नायरनेही केले लग्न,असा होता दोघांचा अंदाज

णी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. गेल्या काहीदिवासांत हिंदी मालिकेतील कलाकारांनीही विवाहबंधनात अडकल आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.यात दीपिका कक्कड-शोएब इब्राहिम, गौतम रोडे-पंखुडी अवस्थी आणि गौरव चोपडा-हितिशानंतर आता टीव्ही अभिनेत्यानेही लग्न केले आहे.''आया मौसम प्यार का'' म्हणत आणखीन एक टीव्ही अभिनेता लवकरच बोहल्यावर चढला आहे.मुदित नायरने 28 फेब्रुवारीला 2018 मध्ये आपली गर्लफ्रेंड अपराजिता श्रीवास्तवसोबत विवाहबंधनात अडकला आहे.नुकतेच त्यांनी इस्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या लग्नाची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली आहे.या दोघांने डेस्टीनेशन वेडींग केले होते.त्यामुळे लग्नाच्या सर्व कार्यक्रम  गोव्यात पार पडले.अपराजिता ही व्यवसायाने वकिल आहे.या लग्नसोहळ्याला मुदित आणि अपराजिताचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.या नवदाम्पत्याच्या विविध अदा,लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.या फोटोंमध्ये नववधू अपराजिताचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पाहून रसिकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे.

 SEE PICS:पाहा दिपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमच्या लग्नाचे फोटो

Web Title: TV Actor Mudit Nayar also made the marriage, that was the case of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.