या टिव्ही अभिनेत्याने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 11:23 IST2016-12-14T11:01:19+5:302016-12-14T11:23:30+5:30
क्राईम पेट्रोल या प्रसिद्ध कार्यक्रमात अनेकवेळा पोलिसांच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता कमलेश पांडे याने स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली. क्राईम ...

या टिव्ही अभिनेत्याने केली आत्महत्या
क राईम पेट्रोल या प्रसिद्ध कार्यक्रमात अनेकवेळा पोलिसांच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता कमलेश पांडे याने स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली. क्राईम पेट्रोल या कार्यक्रमात प्रेक्षकांना गुन्हे विश्वातील कथा पाहायला मिळतात. या कार्यक्रमात अनेकवेळा आत्महत्यांच्याही कथा दाखवल्या जातात. याच कार्यक्रमातील अनेक भागांत झळकलेल्या अभिनेत्याने मध्यप्रदेशमध्ये आत्महत्या केली.
![Crime Patrol Actor Kamlesh Pandey Commits Suicide]()
कमलेशने दारूच्या नशेत स्वतःच्या छातीवर गोळी झाडली. त्यानंतर लगेचच त्याच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कमलेशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण त्याच्या आत्महत्येमागे काही वैयक्तिक कारण असू शकते अशी सध्या चर्चा आहे. कारण कमलेशने आत्महत्या करण्यापूर्वी घरातील लोकांसोबत त्याची बाचाबाची झाली होती असे म्हटले जाते. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
![]()
कमलेश हा मुंबईत आपले भाग्य आजमावत असला तरी तो मुळचा मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे राहाणारा होता.

झगमगत्या दुनियेतील कलाकारांनी आत्महत्यासारखे पाऊल उचलणे हे काही नवीन नाही. याआधी प्रत्युषा बॅनर्जी, कुलजीत रंधावा यांसारख्या अनेक कलाकारांनी आत्महत्या केल्या आहेत. अभिनयक्षेत्रात आपले करियर करत असताना वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्याचा ताळमेळ बसवताना या कलाकारांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच अनेकजण आत्महत्यासारखे पाऊल उचलतात. क्राईम पेट्रोल हा कार्यक्रम गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक भागात प्रेक्षकांना नवनवे कलाकार पाहायला मिळतात. कमलेश हा आजपर्यंत अनेक भागात झळकला असल्याने प्रेक्षकांच्या तो चांगलाच लक्षात आहे.