चाहुल मालिकेला मिळणार हे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 15:25 IST2017-04-28T09:55:35+5:302017-04-28T15:25:35+5:30

चाहूल मालिकेमध्ये सध्या भोसले वाड्यावर असलेल्या भूताच्या शोधात शांभवी आहे. निर्मला शांभवीच्या मार्गात अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. ...

This turn of the series will be won | चाहुल मालिकेला मिळणार हे वळण

चाहुल मालिकेला मिळणार हे वळण

हूल मालिकेमध्ये सध्या भोसले वाड्यावर असलेल्या भूताच्या शोधात शांभवी आहे. निर्मला शांभवीच्या मार्गात अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. शांभवीला वाड्यातील भूताबद्दल कळले तर ती सर्जापासून कायमची दूर होईल अशी भीती निर्मलाच्या मनात आहे. म्हणूनच निर्मलाने शांभवीला चकवा देण्यासाठी भोसले वाड्यामध्ये स्नेहा हे लहान भूत आणले होते. पण आता निर्मला तिनेच रचलेल्या खेळामध्ये पुरती अडकली आहे. कारण स्नेहा वाड्यातून बाहेर पडल्यामुळे निर्मलाच्या सगळ्या शक्ती निघून गेल्या आहेत आणि हे तिला वाड्यात आल्यावर कळले आहे. निर्मला आता चांगलीच संतापली आहे. तसेच, भानुमतीने तिला दिलेल्या नकारामुळे निर्मला वाईट शक्तींच्या मार्गावर गेली आहे. वाईट शक्तींच्या मदतीने तिच्या शक्ती तिने परत मिळाल्या आहेत. पण त्या बदल्यात आता तिला महादेवचा बळी द्यावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना स्नेहा शांभवीला वाड्यामध्ये कोणाचा तरी खून झाला आहे हे एका वेगळ्याच पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे आता शांभवी वाड्यामध्ये कोणाचा खून झाला आहे हे शोधणार आहे. आता शांभवी निर्मलाच्या खुनाचे सत्य सर्जाला कसे सांगणार? सर्जाला ते कळणार का? की निर्मला कुठला नवा सापळा रचणार? हे बघणे रंजक असणार आहे.
या सगळ्या अघटित घटना घडत असतानाच आता वाड्यावर बबन्या आल्याने नवे वळण आले आहे. बबन्याला शांभवी वाड्यावर घेऊन आली असून त्याला पाहून वाड्यातील सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. पण सर्जा मात्र खुश आहे. कारण आता निर्मला कुठे आहे हे नक्कीच कळेल अशी त्याला खात्री आहे. परंतु, लवकरच बबन्या निर्मलाचा खून झाला असल्याचे शांभवीला सांगणार आहे. निर्मलाच्या रचलेल्या सापळ्यात बबन्या आणि शांभवी पुरते अडकले असून सर्जासमोर शांभवी खोट्यात पडणार आहे का हे मालिकेत पाहायला मिळणार आहे. परंतु या सापळ्यामधूनदेखील शांभवी बाहेर पडून सर्जाला घेऊन जंगलामध्ये जाणार आहे. आता जंगलामध्ये काय होणार? निर्मलाच्या मृत्यूचे रहस्य बबन्याद्वारे सर्जाला कळणार की सर्जा आणि शांभवीच्या मैत्रीत दुरावा येणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.

Web Title: This turn of the series will be won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.