​राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेला मिळणार हे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 09:48 IST2018-03-22T04:18:52+5:302018-03-22T09:48:52+5:30

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये सध्या प्रेम आणि राधा समोर अनेक अडचणी आणि आव्हाने येत आहेत. एकीकडे दीपिका आणि ...

The turn of Radha will be available in this series | ​राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेला मिळणार हे वळण

​राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेला मिळणार हे वळण

धा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये सध्या प्रेम आणि राधा समोर अनेक अडचणी आणि आव्हाने येत आहेत. एकीकडे दीपिका आणि दुसरीकडे राधाचा असलेला विश्वास तसेच आईला दिलेले वचन यामध्ये प्रेम पूर्णपणे अडकलेला आहे. श्रावणी काकूच्या वारंवार घालून पाडून बोलण्याला कंटाळून आदित्यने तिला घराबाहेर काढले होते. राधा आणि प्रेमला हे कळताच ते श्रावणी काकूला शोधायला घराबाहेर पडतात आणि राधाच्या सांगण्यावरून श्रावणी काकू घरी येण्यास तयार होते. पण आता येणाऱ्या भागांमध्ये प्रेम आणि राधाची वाढती मैत्री पाहाता दीपिका आणि तिची आई प्रेमला एका तासाची मुदत देणार आहेत. आता प्रेम कुठला मार्ग स्वीकारणार? आईला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? राधाचा प्रेमवर असलेला विश्वास कायम राखण्यासाठी प्रेम काय करणार? हे बघणे रंजक असणार आहे. 
प्रेमला दीपिका आणि तिच्या आईने दिलेल्या धमकीमुळे तो गोंधळून जाणार आहे. दीपिका गरोदर आहे. पण हे बाळ खरोखरच प्रेमचे आहे का? की प्रेमला अडकवण्यासाठी दीपिका प्रेमशी खोटे बोलते आहे? प्रेमच्या मनात असणारे हे प्रश्न तो राधाला सांगेल का? राधाचे यावर काय म्हणणे असेल? असे अनेक प्रश्न आता प्रेमला पडणार आहेत. या संकंटामधून कसा मार्ग काढावा? या अडचणीतून बाहेर येण्यासाठी प्रेम राधाला विश्वासात घेऊन त्याच्या भावना व्यक्त करेल का? राधा त्याला समजून घेईल का? प्रेमला राधाची साथ मिळेल का? याची उत्तरे प्रेक्षकांना पुढील भागांमध्ये मिळणार आहे.
राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका सुरू झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यामुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. उत्कृष्ट अभिनय, आपल्या कुटुंबावर निस्वार्थीपणाने प्रेम करणाऱ्या राधाने आपल्या सोज्वळ स्वभाव आणि नाजूक बोलण्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच १३ वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सचित पाटील म्हणजेच प्रेम याचा सहज अभिनय, तो साकारत असलेला प्रेम, दीपिका म्हणजेच अर्चना निपाणकर हिचे खोचक बोलणारे, विश्वनाथचा तडफदार खेळ या सगळ्यालाच प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच या मालिकेने नुकतेच १०० भाग पूर्ण केले आहेत.
 
Also Read : “राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेचे १०० भाग पूर्ण,सेलिब्रेशनवेळी कलाकारांनी अशी केली धमाल

Web Title: The turn of Radha will be available in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.