'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेच्या कलाकारांनी घेतलं कोल्हापूराच्या अंबाबाईचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 07:20 PM2023-03-14T19:20:02+5:302023-03-14T19:24:09+5:30

शर्मिष्ठा राऊत या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Tula Shikvin Changalach Dhada serial Actors took darshan of ambabai of Kolhapur | 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेच्या कलाकारांनी घेतलं कोल्हापूराच्या अंबाबाईचं दर्शन

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेच्या कलाकारांनी घेतलं कोल्हापूराच्या अंबाबाईचं दर्शन

googlenewsNext

झी मराठीवर १३ मार्चपासून तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत कविता लाड, ऋषिकेश शेलार, शिवानी रांगोळे मुख्य भूमिकेत आहेत.  मालिकेच्या कलाकारांनी प्रमोशनच्या निमित्ताने कोल्हापुरात विविध ठिकाणी हजेरी लावली. ह्या मालिकेचे प्रमुख कलाकार  कविता लाड, ऋषिकेश शेलार, शिवानी रांगोळे सोबत मालिकेच्या निर्मात्या शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई आणि दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड हे देखील उपस्थित होते. या सर्वानी सर्वात प्रथम अंबाबाईचं दर्शन घेऊन मालिकेच्या यशासाठी प्रार्थना केली आणि कोल्हापूमधील मेन राजाराम कॉलेज आणि यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या आणि मालिकेच्या टायटल ट्रॅकवर ठेका सुद्धा धरला.

ही मालिका आहे एका शिक्षिकेची म्हणजेच अक्षराची जी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, आणि अधिपतीची जो कमी शिकलेला पण गर्भ श्रीमंत आहे. अक्षरा सुंदर, सुशिक्षित, गुणी आणि तत्वनिष्ठ मुलगी आहे तिची शिक्षणाविषयी ठाम भूमिका आहे, शिक्षण फक्त प्रगती करत नाही तर चरित्र घडवत. तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करत असं तीच म्हणणं आहे, म्हणून तिने शिक्षण क्षेत्र स्विकारलं. तर दुसरीकडे मालिकेचा नायक अधिपतीचे अनेक व्यवसाय आहेत, त्याच्या मालकीची एक शाळा देखील आहे. 

पण त्याने नववीनंतर शिक्षण सोडलं कारण त्याच्या आईच म्हणणं आहे की शिक्षणाने कुणाचं भलं होत नाही, शिक्षण हे गरिबांसाठी असत त्यामुळे त्यांना नोकरी लागते, अधिपतीसाठी शिक्षण कधीही त्याच्या आड आलं नाही कारण त्याने अनेक व्यवसाय यशस्वीपणे केले आहेत. अधिपतीच आईवर खूप प्रेम आहे, अधिपती अक्षराच्या प्रेमात पडला पण मनातून खुश नसूनही आईने त्या दोघांचं लग्न लावून दिलंय. 


 कोल्हापुरात होणाऱ्या या मालिकेचं लेखन केलंय मधुगंधा कुलकर्णी हिने तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत चंद्रकांत गायकवाड. शर्मिष्ठा राऊत या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.
 

Web Title: Tula Shikvin Changalach Dhada serial Actors took darshan of ambabai of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.