रिमेक का है जमाना, ‘तुला पाहते रे’ मालिकेचा हिंदी व्हर्जन लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 06:13 PM2021-11-03T18:13:17+5:302021-11-03T18:15:51+5:30

'तुला पाहते रे' मालिकेला मिळालेल्या लोकप्रियता पाहाता आता हिंदी मध्येही ही मालिका सुरु होणार आहे. हिंदी व्हर्जनमध्ये असलेल्या मालिकेचे नाव ‘तेरे बिन जिया जाए ना’असे असणार आहे.

Tula Pahate Re, Marathi Serials Hindi Remake Tere Bina Jiya Jaye Na will soon be featuring on television, check details | रिमेक का है जमाना, ‘तुला पाहते रे’ मालिकेचा हिंदी व्हर्जन लवकरच रसिकांच्या भेटीला

रिमेक का है जमाना, ‘तुला पाहते रे’ मालिकेचा हिंदी व्हर्जन लवकरच रसिकांच्या भेटीला

googlenewsNext

मराठी सिनेमांचे हिंदी रिमेक आपण पाहिले आहेत. रिमेकचा हाच फॉर्मुला छोट्या पडद्यावरही चांगलाच हिट ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. रिमेक केलेल्या मालिकांचा सध्या बोलबाला असून रसिकांचाही त्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. त्याचेच उदाहरण द्यायचे झाले तर हिंदीमध्ये सुरु असलेली 'अनुपमा' ही मालिका सध्या प्रचंड हिट ठरत आहे. 'आई कुठे काय करते' या मराठी मालिकेची 'अनुपमा' मालिकेचे हिंदीमध्ये रिमेक करण्यात आले आहे. छोट्या पडद्यावर रिमेकचा फॉर्मुलाही चांगलाच  हिट ठरल्याचे पाहायला मिळत आहे.पुन्हा एक नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. 

छोट्या पडद्यावर 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार यांची केमिस्ट्री रसिकांना चांगलीच भावली होती. या मालिकेमुळे कलाकारांना वेगळीच लोकप्रियता मिळाली होती. मालिकेचे कथानक आणि दमदार भूमिका यामुळे रसिकही अगदी पहिल्या भागापासून मालिकेला खिळून होते. मालिका संपूनही आता बरेच दिवस झाले असले तरी मालिकेच्या कलाकार आणि त्यांच्या भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करुन आहेत. मराठीत ही मालिका सुपरहिट ठरली होती. 

'तुला पाहते रे' मालिकेला मिळालेल्या लोकप्रियता पाहाता आता हिंदी मध्येही ही मालिका सुरु होणार आहे. हिंदी व्हर्जनमध्ये असलेल्या मालिकेचे नाव  ‘तेरे बिन जिया जाए ना’ असे असणार आहे.पहिल्यांदाच ही मालिका हिंदी भाषेत रिमेक केला जाणार आहे असे नसून  ‘तुला पाहते रे’ या मालिकेचा रिमेक सहा ते सात भाषेत करण्यात आला आहे. येत्या ९ नोव्हेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. टीव्हीवर मालिकेचे प्रोमोही झळकू लागले आहेत.  या मालिकेचे प्रोमो पाहिल्यानंतर ‘तुला पाहते रे’ या मालिकेचा रिमेक असल्याच्याच चर्चा सुरु आहेत.त्यामुळे आता हिंदी रिमेक असलेल्या या मालिकेला रसिक कितपत पसंती देतात हेच पाहणं रंजक असणार आहे. 

Web Title: Tula Pahate Re, Marathi Serials Hindi Remake Tere Bina Jiya Jaye Na will soon be featuring on television, check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.