Haldi ceremony Highlights: फूल टू राडा! अमृता पवारच्या हळदीचा व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 12:42 PM2022-07-06T12:42:17+5:302022-07-06T12:42:40+5:30

Amruta pawar: अमृताने इन्स्टाग्रामवर तिच्या हळदी समारंभाचे हायलाइट्स शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नववधूंनी हळद लागण्यापासून ते संध्याकाळच्या संगीत सोहळ्यापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाची लहानशी झलक दाखवण्यात आली आहे.

tujhya majhya sansarala ani kaay hawa actress amruta pawar haldi ceremony Highlights | Haldi ceremony Highlights: फूल टू राडा! अमृता पवारच्या हळदीचा व्हिडीओ आला समोर

Haldi ceremony Highlights: फूल टू राडा! अमृता पवारच्या हळदीचा व्हिडीओ आला समोर

googlenewsNext

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!' (Tujhya Majhya Sansarala Ani Kaay Hawa) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता पवार (Amruta pawar). या मालिकेत आदिती ही भूमिका साकारुन अमृताने बरीचशी लोकप्रियता मिळवली. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी अमृता सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत येत आहे. अमृताच्या घरी लगीनघाई सुरु असून नुकताच तिचा हळदी समारंभ पार पडला. या हळदीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मराठी कलाविश्वातील गुणी आणि सालस अभिनेत्री म्हणून अमृताकडे पाहिलं जातं. मात्र, खऱ्या आयुष्यात अमृता एकदम बिंधास्त असल्याचं पाहायला मिळतं. तिच्या या बिंधास्तपणाची एक झलक तिच्या हळदीमध्ये पाहायला मिळाली. अमृता आज (६ जुलै) नील पाटीलसोबत लग्नबंधनात बांधली जाणार आहे.

अमृताने इन्स्टाग्रामवर तिच्या हळदी समारंभाचे हायलाइट्स शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नववधूंनी हळद लागण्यापासून ते संध्याकाळच्या संगीत सोहळ्यापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाची लहानशी झलक दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अमृता आणि नीलच्या घरी सध्या लग्नाची गडबड असून दोघांच्याही घरी लग्नापूर्वीचे सगळे कार्यक्रम विधीवत पार पडले. यात अमृताने तिची बॅचलर्स पार्टीही एन्जॉय केली. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अमृताने या लग्नविधींचे असंख्य फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

दरम्यान, अमृताने नील पाटीलला जोडीदार म्हणून निवडलं आहे. गेल्या 4 एप्रिल रोजी अमृता व नीलचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेव्यतिरिक्त अमृताने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली आहे.
 

Web Title: tujhya majhya sansarala ani kaay hawa actress amruta pawar haldi ceremony Highlights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.