'तू चाल पुढं' फेम धनश्री काडगावकरने शेअर केला लेकासोबतचा क्युट व्हिडिओ; यूजर्स म्हणाले- कलाकार असूनही...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 04:14 PM2023-08-09T16:14:51+5:302023-08-09T17:28:27+5:30

'तू चाल पुढं' फेम धनश्री काडगावकरने लेकासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Tu Chal Pudhe fame dhanashree kadgaokar share cute video with son kabir | 'तू चाल पुढं' फेम धनश्री काडगावकरने शेअर केला लेकासोबतचा क्युट व्हिडिओ; यूजर्स म्हणाले- कलाकार असूनही...

'तू चाल पुढं' फेम धनश्री काडगावकरने शेअर केला लेकासोबतचा क्युट व्हिडिओ; यूजर्स म्हणाले- कलाकार असूनही...

googlenewsNext

झी मराठीवरील 'तू चाल पुढं'  (Tu Chal Pudhe) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेत येणारी वळणं आणि चढउतार यामुळे ती दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे. इतकंच नाही तर या मालिकेमध्ये अभिनेत्री धनश्री काडगावकरने (Dhanashri Kadgaonkar) नकारात्मक भूमिका साकारुनही लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा आहे. याच दरम्यान अभिनेत्रीने लेकासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.   

धनश्रीच्या मुलाचं नाव कबीर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कबीरसोबत एक क्युट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धनश्री कबीरला आई कशी दिसतेय?असा प्रश्न विचारते यावर कबीर म्हणतो छान दिसते. मग धनश्री त्याला विचारते. कबीर कसा दिसतो? छान दिसतो? यावर निरागस कबीर म्हणतो, बाबा पण छान दिसते. लेकचे हे बोलणं ऐकून धनश्री म्हणते, आई गं.. किती छान. हो तुझा बाबा पण छान दिसतो असं म्हणत ती त्याच्या गालावर किस करते.    


हा व्हिडीओ शेअर करताना धनश्रीने लिहिले, बाबा प्रेम कायम आहे. लव्ह यू बाबा, असं या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. सध्या धनश्रीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. धनश्रीच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांनी ही प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका यूजरने लिहिले, कबीर तर लाडू सारखा दिसतो सेम. दुसऱ्या एकाने लिहिले, बाबा हा आयुष्याचा एक मौल्यवान दागिना आहे त्यामुळे बाबा हा नावात खूप महत्व आहे. आणखी एकाने लिहिले, कलाकार असूनही आपल्या मातृभाषेत केलेला संवाद खूप भावला....!!    
 

Web Title: Tu Chal Pudhe fame dhanashree kadgaokar share cute video with son kabir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.