'तू चाल पुढं' मालिका रोमांचक वळणावर, साध्याभोळ्या अश्विनीचा सुरु होणार ग्लॅमरस प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:45 PM2023-03-28T12:45:38+5:302023-03-28T12:47:20+5:30

प्रेक्षकांना आपल्याशा वाटणाऱ्या साध्याभोळ्या अश्विनीचा ग्लॅमरस प्रवास सुरु झाला आहे. अनेक अडथळ्यांना पार करुन अश्विनीने ‘मिसेस इंडिया २०२३’ ग्रॅन्ड फिनालेमध्ये एंट्री केली आहे.

Tu Chal Pudha serial episodic the glamorous journey of simple Ashwini will begin | 'तू चाल पुढं' मालिका रोमांचक वळणावर, साध्याभोळ्या अश्विनीचा सुरु होणार ग्लॅमरस प्रवास

'तू चाल पुढं' मालिका रोमांचक वळणावर, साध्याभोळ्या अश्विनीचा सुरु होणार ग्लॅमरस प्रवास

googlenewsNext

अभिनेत्री दीपा परब हिने जवळपास १४ वर्षानंतर पुन्हा एकदा 'तू चाल पुढं' या मालिकेतून मराठीत कमबॅक केलं. या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची. एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीलादेखील त्यांच्या नवीन घरासाठी आणि कुटुंबासाठी खारीचा वाटा उचलण्याची इच्छा आहे. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे कारण ‘मिसेस इंडिया २०२३’ ग्रॅन्ड फिनाले लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे, मराठी मालिकेत प्रथमच इतक्या ग्रँड पद्धतीने ही स्पर्धा पार पडतेय. 

या ग्रँड फिनालेच परीक्षण ‘इशा कोप्पीकर’ करणार आहे. प्रेक्षकांना आपलीशी वाटणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस प्रवास सुरु झाला आणि मालिकेतील अश्विनीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी उचलून धरलं. या स्पर्धेदरम्यान तिला अनेक अडथळ्यांमधून जावं लागलं. पण अखेरीस अश्विनीने या स्पर्धेत पुन्हा कमबॅक केलं. अश्विनीची हि भूमिका सर्वसमावेशक आहे. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभाव, तिचं घराप्रती कर्तव्य ह्या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेणाऱ्या अश्विनीचा मिसेस इंडिया २०२३ ग्रॅन्ड फिनालेचा प्रवास सुरु झालाय.

 आता अश्विनीला गरज आहे तुमच्या आशिर्वादाची, कारण ही स्पर्धा सोपी नाही आणि शिल्पी तिच्या ह्या प्रवासात अडथळे आणणार हे नक्की. 'तू चाल पुढं' मिसेस इंडिया २०२३ ग्रॅन्ड फिनाले  २८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान रंगणार आहे. 


 

Web Title: Tu Chal Pudha serial episodic the glamorous journey of simple Ashwini will begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.