​जळगावच्या तनयचा आज ‘डू आॅर डाय’ परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 15:16 IST2016-08-20T09:40:57+5:302016-08-20T15:16:46+5:30

स्टार टी.व्ही.च्या ‘डान्स प्लस’ या रिअ‍ॅलिटी शो मध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जळगावच्या तनय मल्हाराचा आज  ‘डू आॅर डाय’ ...

Today's 'Do and Die' Performance for Jalgaon's Tanve | ​जळगावच्या तनयचा आज ‘डू आॅर डाय’ परफॉर्मन्स

​जळगावच्या तनयचा आज ‘डू आॅर डाय’ परफॉर्मन्स

ong>स्टार टी.व्ही.च्या ‘डान्स प्लस’ या रिअ‍ॅलिटी शो मध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जळगावच्या तनय मल्हाराचा आज  ‘डू आॅर डाय’ परफॉर्मन्स होणार असून तो ‘टॉप सिक्स’मध्ये पोहचतो की नाही, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या या सादरीकरणाबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.



 प्रत्येक नृत्याला तनयने भरभरून स्तुती व गुण मिळविलेले आहेत. तरीही तो अद्याप टॉप ६ मध्ये आपली जागा निश्चित करू शकलेला नाही.  आतापर्यंत टॉप ५ निवडलेले आहेत. त्यात काश्मीरचा पियूश भगत, नेपाळचा सुशांत खत्री, सिक्किमचा मिग्मा, चंदीगढचा बेंडिट्स ग्रुप व दिल्लीचा अर्बन क्रू निवडले गेले आहे. स्पर्धेत महाराष्ट्राचे अजून खाते उघडलेले नाही.



२० रोजी शेवटचा भाग असून त्यात टॉप १२ पैकी उरलेले ७ स्पर्धक व स्टॅँडबाय मधील ३ अशा एकूण १० पैकी फक्त एकाचा पहिल्या ६ मध्ये समावेश होणार आहे. पहिल्या ६ मध्ये येण्यासाठी  दिवस-रात्र मेहनत करणारा जळगावचा तनय आपले सर्वस्व पणाला लावून महाराष्ट्राची शान राखण्याचा प्रयत्न करणार आहे.  त्याचे कोरिओग्राफर धर्मेशही त्यासाठी प्रयत्नशील आहेत.



....तर तो जाणार ‘टॉप फोर’ मध्ये
२० व २१ रोजी रात्री ८ वाजता स्टार टीव्हीवरील ‘डान्स प्लस सिझन २’ हा कार्यक्रम होणार आहे. पहिल्या ६ मध्ये निवड झाल्यावर यापुढे जशा फेऱ्या संपतील; तसे गुण देणेही बंद होईल. सहाच्या सहा नृत्य करणारे स्पर्धक दर आठवड्याला आपले नृत्य सादर करतील व जनतेला मतदान करण्याचे आवाहन करतील. ज्या स्पर्धकाला सर्वात जास्त मते मिळतील तो स्पर्धक पहिल्या ४ साठी पात्र ठरेल. या पद्धतीने पुढील चार आठवडे कार्यक्रम चालेल. त्यात पहिले ४ स्पर्धक जनतेमार्फत निवडण्यात येतील व नंतर फिनाले होईल. यात पहिले ४ सादरीकरण करतील व त्यातून मतदानाच्या आधारे पहिला, दूसरा व तिसरा विजेता निवडला जाईल.



 

Web Title: Today's 'Do and Die' Performance for Jalgaon's Tanve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.