Titeeksha Tawde : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही नवी मालिका आहे ‘या’ मालिकेचा रिमेक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 08:00 AM2022-08-22T08:00:00+5:302022-08-22T08:00:01+5:30

Satvya Mulichi Satavi Mulagi : झी मराठीवर एकापाठोपाठ एक नव्या मालिका सुरू होत आहेत. आता एक आणखी नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. होय, या मालिकेचं नाव आहे, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’.

Titeeksha Tawde New Serial Satvya Mulichi Satavi Mulagi On Zee Marathi | Titeeksha Tawde : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही नवी मालिका आहे ‘या’ मालिकेचा रिमेक!

Titeeksha Tawde : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही नवी मालिका आहे ‘या’ मालिकेचा रिमेक!

googlenewsNext

झी मराठीवर एकापाठोपाठ एक नव्या मालिका सुरू होत आहेत. आता एक आणखी नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. होय, या मालिकेचं नाव आहे, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulagi ).  ही नवी कोरी मालिका येत्या  १२ सप्टेंबर पासून रात्री १०. ३० वाजता प्रसारित होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे ( Titeeksha Tawde) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
तितिक्षाच्या या नव्या मालिकेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. सगळेच १२ सप्टेंबरची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

मालिकेची ढोबळ कथा तुम्हाला कळली असेलच. या मालिकेतील तितिक्षा नेत्राची भूमिका साकारतेय. नेत्रा ही गावातील एक सामान्य मुलगी. पण तिला असामान्य देणगी मिळाली असते. या नेत्राला त्रिनयना या देवीने भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलेलं असतं. नेत्रा दिव्यशक्तीच्या आधारे भविष्य पाहू शकते. या दिव्य शक्तीचा वापर तिला लोकांच्या भल्यासाठी करायचा आहे. पण हे करत असताना तिला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. भविष्यात काय होणार, हे जाणणा-या नेत्राला तिला वाईट समजलं जातं, असं या मालिकेचं कथानक असल्याचं कळतंय. विशेष म्हणजे ही मालिका एका बंगाली मालिकेचा रिमेक आहे.

होय,  ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका ‘त्रिनयनी’ या मूळ बंगाली मालिकेचा मराठी रिमेक असल्याचं समजतंय. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, ‘त्रिनयनी’ या मालिकेचा  पंजाबी रिमेकही आला होता.  झी पंजाबी वाहिनीवर  ‘नयन’ या नावाने ही मालिका प्रसारित झाली होती.  आता मराठीत  ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या नावाने ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.  या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसंच या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले,रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत

Web Title: Titeeksha Tawde New Serial Satvya Mulichi Satavi Mulagi On Zee Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.