वारिस या मालिकेतील भूमिकेसाठी आरती सिंगने घेतल्या निलम कोठारीकडून टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 16:01 IST2017-01-27T10:31:43+5:302017-01-27T16:01:43+5:30
गोविंदाची भाची आरती सिंग सध्या वारिस या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेसाठी तिने अभिनेत्री निलम ...

वारिस या मालिकेतील भूमिकेसाठी आरती सिंगने घेतल्या निलम कोठारीकडून टिप्स
ग विंदाची भाची आरती सिंग सध्या वारिस या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेसाठी तिने अभिनेत्री निलम कोठारीकडून नुकत्याच काही टिप्स घेतल्या आहेत.
निलम आणि गोविंदा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिटदेखील ठरले आहेत. त्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत असे. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील खूप चांगली आहे. केवळ गोविंदासोबतच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांसमवेतदेखील निलमचे नाते खूप चांगले आहे. गोविंदाची भाची आरती आणि निलम या खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या चांगल्या फ्रेंड्स आहेत.
![Ek ladka Ek Ladki]()
वारिस या मालिकेच्या कथानकाला आता कलाटणी मिळणार आहे. आरती सिंगची स्मरणशक्ती गेल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या या कथानकाबद्दल आरतीला सांगताच तिला निलम कोठारीची लगेचच आठवण आली. निलमने एक लडका एक लडकी या कार्यक्रमात स्मरणशक्ती गेलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यामुळे ही भूमिका साकरण्यासाठी निलमच्या एक लडका एक लडकी या चित्रपटातील भूमिकेची ती मदत घेणार आहे. आरतीला या भूमिकेबद्दल कळ्यानंतर तिने लगेचच निलमला फोन केला आणि तिच्याकडून काही टिप्स घेतल्या. याविषयी आरती सांगते, "निलम आणि मी अनेक वर्षांपासून खूप चांगल्या फ्रेंड्स आहोत. त्यामुळे वारिस या मालिकेतील माझी भूमिका साकारण्यासाठी मी निलमच्या एक लडका एक लडकी या चित्रपटातील भूमिकेकडून प्रेरणा घेणार आहे. मी यापूर्वी अशाप्रकारची भूमिका कधीच साकारली नसल्याने मी ही भूमिका साकारण्यास खूप उत्सुक आहे."
आरतीची स्मरणशक्ती गेल्यानंतर या मालिकेतील तिचा लूकदेखील बदलेला दाखवण्यात येणार आहे.