न्यूड मॉडेलच्या पाठीवर बसून संस्कारी बहू टीना दत्ताने केले बोल्ड फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 19:56 IST2017-12-13T14:26:38+5:302017-12-13T19:56:51+5:30

‘उतरन’ या मालिकेत संस्कारी बहूची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या टीना दत्ताचा एकदमच हटके अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे. वाचा सविस्तर!

Tina Dutt made a bold photoshoot with her daughter-in-law on the back of the Nude model! | न्यूड मॉडेलच्या पाठीवर बसून संस्कारी बहू टीना दत्ताने केले बोल्ड फोटोशूट!

न्यूड मॉडेलच्या पाठीवर बसून संस्कारी बहू टीना दत्ताने केले बोल्ड फोटोशूट!

रसिद्ध मालिका ‘उतरन’ मधील इच्छाला आजही टीव्ही जगतातील सर्वाधिक प्रेमळ बहूपैकी समजले जाते. टीना दत्ताने संस्कारी बहू इच्छाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले होते. ‘उतरन’ या मालिकेने तिला एवढी लोकप्रियता मिळवून दिली की, ती आजही ‘संस्कारी बहू’ म्हणूनच लाइमलाइटमध्ये आहे. परंतु या संस्कारी बहूने असे काही हॉट फोटोशूट केले, ज्यामुळे तिचे चाहते अवाक् झाले आहेत. वास्तविक टीना नेहमीच फोटोशूट करून ते फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करीत असते. मात्र आता तिने जे फोटोशूट केले आहे, ते सोशल मीडियावर चांगलेच चर्चिले जात आहेत. कारण या शूटमध्ये टीना खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. टीना एका न्यूड मॉडेलच्या पाठीवर बसून फोटोशूट करताना दिसत आहे. या मॉडेलचे नाव अंकित भाटिया आहे. २०१८ च्या कॅलेंडरकरिता टीनाने हे फोटोशूट केले आहे. मात्र टीनाचा हा अवतार बघून तिच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. कारण ‘संस्कारी बहू’ म्हणून लोकप्रिय असलेल्या टीनाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांनी पहिल्यांदाच बघितला आहे. 



२०१० मध्ये कलर्स टीव्हीवर ‘उतरन’ या मालिकेतील टीनाच्या इच्छा वीरसिंग बुंदेला या भूमकेसाठी प्रोड्यूसर गिल्डतर्फे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला होता. खरं तर ज्या पद्धतीने टीनाने एका संस्कारी बहूची भूमिका साकारली होती, त्यावरून ती या पुरस्कारास पात्र असल्याचे तिच्या चाहत्यांनीच म्हटले होते. टीनाने टीव्हीबरोबरच मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. २००५ मध्ये आलेल्या ‘परिणिता’ या चित्रपटात तिने विद्या बालनच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. 
 

‘उतरन’ अगोदर टीनाने रितूपर्णो घोषच्या ‘चोखेर बाली’ या चित्रपटात काम केले केले. चित्रपटात तिने १६ वर्षीय ऐश्वर्याची भूमिका साकारली होती. एकूणच आतापर्यंत टीना पडद्यावर अतिशय साध्याभोळ्या अंदाजात बघावयास मिळाली. मात्र आता तिचा हा हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अंदाज समोर आल्याने, तिच्या चाहत्यांना ती या अंदाजात कितपत भावेल, हे सांगणे मुश्किलच म्हणावे लागेल. 

Web Title: Tina Dutt made a bold photoshoot with her daughter-in-law on the back of the Nude model!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.