​टायगर श्रॉफने डीआयडी लिटिल मास्टर्स या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या आईंसोबत धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 10:01 IST2018-03-22T04:31:13+5:302018-03-22T10:01:13+5:30

देशातील सामान्य माणसातील विविध गुणांच्या प्रदर्शनासाठी ‘झी टीव्ही’ने गेल्या २५ वर्षांत एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘डान्स इंडिया ...

Tiger Shroff, along with the participants of DID Little Masters, participated in the program | ​टायगर श्रॉफने डीआयडी लिटिल मास्टर्स या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या आईंसोबत धरला ताल

​टायगर श्रॉफने डीआयडी लिटिल मास्टर्स या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या आईंसोबत धरला ताल

शातील सामान्य माणसातील विविध गुणांच्या प्रदर्शनासाठी ‘झी टीव्ही’ने गेल्या २५ वर्षांत एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमाने भारतातील नृत्यक्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाने फैझल खान, हरप्रीत, जीतूमोनी आणि तेरिया मगर यांच्यासारखे उत्कृष्ट नर्तक आजवर दिले आहेत. आता ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ लहान मुलांमधील नृत्यांच्या कौशल्याला वाव देणार आहे. ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमाच्या नव्या सिझनमधील अंतिम १६ स्पर्धकांची नावे नुकतीच घोषित करण्यात आली आहेत. या शो ची निर्मिती एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स लिमिटेड करत आहे. 
‘झी टीव्ही’वरील ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमात आपल्या बागी २ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे कलाकार आता सहभागी होणार आहेत. या कलाकारांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची रंजकता अधिकच वाढणार आहे. कार्यक्रमाच्या या भागासाठी टायगर आणि दिशाने नुकतेच चित्रीकरण केले. आपल्या लवचिक नृत्यशैलीमुळे सर्व लहान मुलांमध्ये टायगर श्रॉफ अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याला व्यासपीठावर आलेला पाहताच सर्व लिटिल मास्टर्स धावत त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला मिठी मारली. नंतर आपल्या उत्कृष्ट नृत्याविष्काराने या लिटिल मास्टरनी टायगरचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. पण या लिटिल मास्टरच्या आईंनी टायगरला आपल्याबरोबर नृत्य करण्याची विनंती केली आणि त्यानेही ती लगेच मान्य केली. त्यांच्याबरोबर काही रोमँटिक गाण्यांवर नृत्य करून त्याने सर्व सगळ्यांचे मनोरंजन केले आणि त्याची प्रशंसा करणाऱ्यांवरही आपला प्रभाव टाकला.
बॉलिवूडची रूपसुंदर तारका चित्रांगदा सिंह आणि बहुआयामी दिग्दर्शक आणि उत्कृष्ट कथाकथनकार म्हणून गणला जाणारा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहेत. त्यांनी या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये परीक्षक म्हणून काम बघितलेला मार्झी पेस्तनजीदेखील या आवृत्तीतही परीक्षकाच्या भूमिकेत आहे. याशिवाय या स्पर्धकांना मार्गदर्शक करण्यास वैष्णवी पाटील, तनय मल्हारा, जीतुमोनी कालिया आणि बीर राधा शेर्पा हे कार्यक्रमाचे स्किपर्स आहेत.

Also Read : डीआयडी लिटिल मास्टर्स या कार्यक्रमात हे कलाकार दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

Web Title: Tiger Shroff, along with the participants of DID Little Masters, participated in the program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.