नीलकांती पाटेकरच्या घरी पोहोचला तीन वर्षांचा छोटा फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 17:31 IST2017-08-11T12:01:34+5:302017-08-11T17:31:34+5:30

 काही दिवसांपूर्वी मुंबईत माहीमला भेटलेला बयोआजीचा तीन वर्षांचा फॅन थेट बयोआजीच्या घरी पोहोचला. इतकंच नाही, तर घरी केलेलं पॅटिस ...

Three-year-old mini-fan reached Nilekanti Patekar's house | नीलकांती पाटेकरच्या घरी पोहोचला तीन वर्षांचा छोटा फॅन

नीलकांती पाटेकरच्या घरी पोहोचला तीन वर्षांचा छोटा फॅन

 
ाही दिवसांपूर्वी मुंबईत माहीमला भेटलेला बयोआजीचा तीन वर्षांचा फॅन थेट बयोआजीच्या घरी पोहोचला. इतकंच नाही, तर घरी केलेलं पॅटिस आणि केळ्याचे वेफर्स खाऊन खुश झाला.'गोठ' या मालिकेत बयोआजी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नीलकांती पाटेकर यांना सिटीलाईटला एक तीन वर्षांचा चिमुकला फॅन भेटला. भर रस्त्यात त्यानं बयोआजी बयोआजी अशी हाक मारली होती.नीलकांती पाटेकर यांनी त्यावेळी त्याच्याशी गप्पाही मारल्या होत्या. मात्र, त्या ओझरत्या भेटीनं त्याचं काही समाधान झालं नाही. पुढे महिनाभर बयोआजीला भेटायचंय म्हणून त्यानं हट्ट केला.त्याच्या आजीनं नीलकांती पाटेकर यांची ओळख काढली. त्याच्या वडिलांबरोबर आलेल्या या तीन वर्षांच्या छोट्या फॅनची नीलकांती पाटेकर यांच्यासह त्यांच्याच घरी भेट झाली.या भेटीनं हा छोटा एकदम खुश झाला.त्यानं विचारलं, 'बयोआजी तू टीव्हीत एवढी का रागावतेस?' त्याच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावं असा प्रश्न नीलकांती पाटेकर यांना पडला. 'अरे, ते सगळं खोटं असतं,' असं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यावर त्या मुलाची कमेंट मार्मिक होती. तो म्हणाला, 'पण ते खरं वाटतं ना!' त्याचं हे उत्तर म्हणजे पाटेकर यांच्या अभिनयाला दाद होती. छोट्या चाहत्याच्या भेटीबद्दल नीलकांती पाटेकर म्हणाल्या, 'मोठ्यांप्रमाणेच ४ ते ६ वयोगटातली मुलंही गोठ बघतात ती आपल्या आजी आजोबांबरोबर. साधारणपणे १०-१२  मुलं मला स्टुडिओत आणि इतरत्र भेटून गेली आहेत. खल प्रवृत्तीच्या बयोआजीकडे ही मुलं इतकी आकर्षित कशी होतात, हे माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं. नंतर लक्षात आलं दुष्ट प्रवृत्ती म्हणजे नक्की काय ह्याची ओळख ह्या चिमण्यांच्या जगात अजून झाली नसल्याने ते त्याला रागीट समजतात, आणि असते अशी एखादी आजी.. तशी ही.. इथं त्यांचा विषय संपतो. त्यामुळे बयोआजीची मोठ्यांना वाटते तशी भीती यांच्या मनात नसते. मला प्रत्यक्ष भेटूनही त्यांच्या मनात बयोआजीचीच इमेज असते.' 

Web Title: Three-year-old mini-fan reached Nilekanti Patekar's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.