अक्षयच्या शोमधून तीन जजसची हकलपट्टी !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 05:01 AM2017-10-17T05:01:49+5:302018-04-03T14:26:05+5:30

तब्बल ९ वर्षांनंतर "द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज" या शोची पुन्हा सुरुवात केली गेली. पण हा शो सुरू झाल्यानंतर ...

Three people from Akshay's show | अक्षयच्या शोमधून तीन जजसची हकलपट्टी !

अक्षयच्या शोमधून तीन जजसची हकलपट्टी !

googlenewsNext
्बल ९ वर्षांनंतर "द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज" या शोची पुन्हा सुरुवात केली गेली. पण हा शो सुरू झाल्यानंतर लगेचच यात बदल करण्यास सुरवात केली गेली. या शोमध्ये पहिल्या एपिसोडपासून जज म्हणून असलेले  जाकीर खान, मल्लिका दुआ आणि हुसेन दलाल यांना शोचे मकर्स लवकरच बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत. त्यांच्या जागेवर बॉलिवूड स्टार श्रेयस तळपदे आणि साजिद खान यांची वर्णी लागणार आहे. ह्या शोच्या मेकर्सनी हा निर्णय त्या दोघांच्या कॉमेडी शोच्या अनुभवावर आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे घेतला आहे.
खबर अशी पण आहे की यूट्यूबवर हिट ठरलेले हे कॉमेडियन टीव्ही वर काही खास धमाल दाखवत नाही आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना साजिद ने म्हटले की 'हे असेच प्लॅन केले गेले होते त्या तिघांनाशो साठी स्पर्धक निवडायचे होते आणि त्यांनी ते केले आणि नंतर श्रेयसला आणि मला अक्षय कुमारबरोबर हा शो जज करायचा होता. जे आता आम्ही करत आहोत. त्या तिघांनी सीलेक्टर चे काम केले आता आम्ही जज चे काम करतोय. परवापासून आम्ही शूटला सुरूवात करणार  आहोत आणि या शोचा भाग बनून मला आनंद होतोय.  
शो बद्धल बोलताना डेव्हलपमेंट प्रोड्युसर अश्विनी याद्री म्हणाले की 'देशभरात ऑडिशन करून आम्ही आता हा शो सुरू केला आहे. त्यात मल्लिका दुआ आणि जाकीर खान ह्याचा मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आता ह्यापुढे या शोचा पुढील प्रवास आम्ही श्रेयस तळपदे आणि साजिद खान बरोबर करणार आहोत". ह्या आधी कॉमेडियन सुनील पालने जाकीर खान ला जज बनवण्याबद्दल नाराजगी व्यक्त केली होती.
काही दिवसांपूर्वी आलेल्या टीआरपी रिपोर्ट कार्डमध्ये सुद्धा अक्षयच्या शोची टीआरपी खूपच कमी होती. अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती आणि सलमान खानच्या बिग बॉसने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' शोला मागे टाकले आहे. त्यामुळे कदाचित मेकर्सनी हा निर्णय घेतला असेल.

Web Title: Three people from Akshay's show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.