'तारक मेहता'च्या नट्टू काकांची ही होती शेवटची इच्छा, बागाने केला खुलासा, म्हणाला - "मृत्यूनंतर त्यांना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:57 IST2025-08-08T11:56:51+5:302025-08-08T11:57:13+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेत बाघाची भूमिका करणाऱ्या तन्मय वेकारिया(Tanmay Vekaria)ने अलीकडेच मालिकेशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या.

'तारक मेहता'च्या नट्टू काकांची ही होती शेवटची इच्छा, बागाने केला खुलासा, म्हणाला - "मृत्यूनंतर त्यांना..."
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेत बाघाची भूमिका करणाऱ्या तन्मय वेकारिया(Tanmay Vekaria)ने अलीकडेच मालिकेशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. त्याने मालिकेमधील सर्वात लोकप्रिय पात्र नट्टू काका उर्फ घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) यांच्याबद्दलही सांगितले. बाघाने नट्टू काकांच्या मृत्यूनंतरची शेवटची इच्छा काय होती आणि त्यांच्या कुटुंबाने ती कशी पूर्ण केली हेदेखील सांगितले.
फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत तन्मय वेकारियाने घनश्याम नायक यांच्या मृत्यूबद्दल पहिल्यांदाच कळल्याबद्दल सांगितले. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी कर्करोगाने घनश्याम नायक यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून कलाकार आणि टीमला धक्का बसला. त्यावेळी डेंग्यूपासून बरे होणारे तन्मय वेकारिया म्हणाले, 'ही बातमी ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले.' घनश्याम नायक यांच्या शेवटच्या इच्छेने अनेकांना प्रभावित केले. नट्टू काका त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जात होते. त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही चांगले कपडे घालण्याची इच्छा व्यक्त केली होती.
घनश्याम नायक यांची शेवटची इच्छा
बागा उर्फ तन्मय वेकारिया यांनी घनश्याम नायक यांच्या कुटुंबाने त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांची शेवटची इच्छा कशी पूर्ण केली हे सांगितले. तन्मय वेकारिया म्हणाले, ''त्यांची शेवटची इच्छा होती की जेव्हा ते मरतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मेकअप असावा. यासाठी मेकअप आर्टिस्टला बोलावण्यात आले होते.''
घनश्याम नायक यांचं कर्करोगानं झालं निधन
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, घनश्याम नायक कर्करोगावर उपचार घेत होते, परंतु त्यांची प्रकृती ठीक असेपर्यंत त्यांनी मालिकेचं शूटिंग सुरू ठेवले. त्यांच्या अनेक सहकलाकारांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला, तर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची टीम अजूनही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.