हे आहेत बिग बॉसमधील खलनायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 14:41 IST2016-11-10T14:41:26+5:302016-11-10T14:41:26+5:30

बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये आपल्याला एक तरी खलनायक अथवा खलनायिका पाहायला मिळते. आपल्या वागणुकीने त्यांनी बिग बॉसचे संपूर्ण घर ...

These are the Big Box villains | हे आहेत बिग बॉसमधील खलनायक

हे आहेत बिग बॉसमधील खलनायक

ग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये आपल्याला एक तरी खलनायक अथवा खलनायिका पाहायला मिळते. आपल्या वागणुकीने त्यांनी बिग बॉसचे संपूर्ण घर डोक्यावर घेतले होते. आताच्या सिझनमध्ये प्रियांका जग्गा खलनायिका बनून सगळ्यांना प्रचंड त्रास देत आहे. यामुळे तिला पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडावे लागले. पण अशा खलनायकांमुळे कार्यक्रमाला चांगलाच टिआरपी मिळतो असे अनेक वर्षांपासूनचे गणित आहे. त्यामुळे या खलनायिकेला वाईल्ड कार्ड एंट्रीने परत घरात आणले जाईल असे अनेकांना वाटत आहे.

बिग बॉस 1 ः राखी सावंत
राखी सावंतला खरी प्रसिद्धी बिग बॉसने मिळवून दिली. बिग बॉसमधील अमित सदच्या ती प्रेमात पडली होती. अमित तिला आवडायला लागल्याचे तिने काही स्पर्धकांनादेखील सांगितले होते. पण अमितने दुर्लक्ष केल्यानंतर ती छोट्या छोट्या कारणांमुळे त्याच्याशी भांडायला लागली. अमितने चुकून तिचा कप वापरला म्हणून तिने तो कप तर फोडला होता. पण यावरून ती त्याच्याशी प्रचंड भांडली होती. 



बिग बॉस 2 ः राजा चौधरी
श्वेता तिवारीचा नवरा असल्याने राजाला बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळाला होता. त्याचा त्याच्या रागावर नियंत्रण नसल्याने तो अनेक स्पर्धकांसोबत भांडला. संभावना सेठसोबत त्याचे झालेले भांडण तर प्रचंड गाजले होते. त्याने तिच्यावर हात उगारण्याचादेखील प्रयत्न केला होता. 


बिग बॉस 3 ः कमल आर खान
केआरके हा वादात अडकणार नाही असे होऊच शकत नाही. बिग बॉसच्या घरात असतानादेखील त्याच्या विचित्र वागण्याने सगळेच स्पर्धक कंटाळले होते. 



बिग बॉस 4 ः डॉली बिंद्रा
आतापर्यंतच्या बिग बॉसमधील सगळ्या सिझनमधील मोस्ट कॉन्ट्रवर्शिअल व्यक्तिमत्त्व म्हणून डॉली बिंद्राला ओळखले जाते. या घरात अभिनेत्री श्वेता तिवारीच्या तर तिने नाकी नऊ आणले होते. रस्त्यावर लोक ज्याप्रकारे भांडतात, तशी ती बिग बॉसच्या घरात भांडत असे.


बिग बॉस 5 ः पूजा मिश्रा
पूजा मिश्रा आणि वाद यांचे जवळचे नाते आहे. नेहमी चर्चेत राहाण्यासाठी ती काही ना काही तरी करत असते. बिग बॉसच्या घरातदेखील तिने सगळ्यांना सळो की पळो करून सोडले होते. 



बिग बॉस 6 ः इमाम सिद्धीकी 
इमाम सिद्धीकीने केवळ बिग बॉसमध्ये राहाणाऱ्या लोकांसोबतच नव्हे तर या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असलेल्या सलमान खानसोबतदेखील पंगा घेतला होता. 




बिग बॉस 7 ः अरमान कोहली आणि एजाज खान
बिग बॉस 7चे पर्व अरमान कोहली-तनिषा मुखर्जी तसेच कुशाल टंडन-गोहर खान यांच्या प्रेमप्रकरणामुळे जितके गाजले, तितकेच हे सिझन अरमान कोहली आणि एजाज खानमुळेही गाजले. अरमान आणि एजाज सगळ्याच स्पर्धकांसोबत भांडत असत. 




बिग बॉस 8 ः अली कुली मिर्झा
अली कुली मिर्झा आणि सोनाली राऊत यांच्या भांडणांंमुळे हा सिझन चर्चेत राहिला होता. सलमानसोबतची त्याची भांडणे झाली होती. 


बिग बॉस 9 ः रिषभ सिन्हा
रिषभची प्रिया आणि किश्वर मर्चंटसोबत झालेली भांडणे प्रचंड गाजली होती. प्रिया मलिकसोबत तर साध्या मिल्कशेकवरून त्याचा वाद झाला होता तर किश्वर आणि त्याची तर अनेक कारणांनी भांडणे झाली होती. 





Web Title: These are the Big Box villains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.