म्हणून क्रितिका कामराबद्दल चंदन आनंदला आहे प्रचंड कुतूहल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 13:37 IST2017-03-30T08:07:26+5:302017-03-30T13:37:26+5:30
सहकलाकार क्रितिका कामराबद्दल चंदन आनंदला आहे प्रचंड कुतूहल जेव्हा दोन सहकलाकार प्रथमच एकत्र काम करायला सुरूवात करताता, तेव्हा त्यांचे ...
म्हणून क्रितिका कामराबद्दल चंदन आनंदला आहे प्रचंड कुतूहल
स कलाकार क्रितिका कामराबद्दल चंदन आनंदला आहे प्रचंड कुतूहल जेव्हा दोन सहकलाकार प्रथमच एकत्र काम करायला सुरूवात करताता, तेव्हा त्यांचे एकमेकांबद्दल एक तर सकारात्मक मत बनते किंवा नकारात्मक. पण क्रितिका कामरासोबत काम करणाऱ्या चंदन आनंदकडे क्रितिकाबद्दल बोलायला फक्त चांगलंच आहे. चंदन आनंद लाईफ ओकेवरील रम्य फिक्शन शो प्रेम या पहेली चंद्रकांतामध्ये क्रूर सिंगची भूमिका करत असून क्रितिका कामरा यात चंद्रकांताची भूमिका करत आहे. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणे जिथे क्रूर सिंगला चंद्रकांता हवी आहे तसेच खऱ्या आयुष्यातही चंदन आनंदला क्रितिका कामरा अतिशय आवडते.“प्रथमच मी क्रितिका कामरासोबत काम करत आहे आणि आपल्या कामावरील तिची निष्ठा पाहून मी थक्क झालो आहे. ती सेटवर कायम वेळेवर पोहोचते आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची तिची इच्छा आहे.व्यावहारिकता आणि भावुकता यांचे ती उत्तम मिश्रण आहे. प्रेम या पहेली चंद्रकांताच्या प्रत्येक भागामध्ये ती एक संपूर्ण सरप्राईज पॅकेज आहे.” असे क्रितिका कामरासोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्यासाठी अतिशय आनंदात असलेला चंदन आनंद म्हणाला.तिच्या व्यक्तिरेखेबद्दल तो म्हणाला, “क्रूर सिंग अतिशय विनोदी, गोड वाटेल असा आणि अतिआत्मविश्वास असलेला व्यक्ती आहे. तो चंद्रकांतापेक्षा बराच मोठा आहे पण तरीही तिच्याशी लग्न करण्याचे त्याचे स्वप्न आहे.चंद्रकांता आणि तिचे वडिल किंग जय सिंग यांच्यावर आपला प्रभाव पाडण्यासाठी तो खूप प्रयत्न करेल. तो ह्या शो चा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे.”