बिग बॉसच्या घरात आज होणार कडाक्याचे भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 11:50 IST2018-06-07T06:20:53+5:302018-06-07T11:50:53+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल देखील रंगला “मिशने ए कुशन” हा टास्क. ज्यामध्ये सई आणि रेशमच्या टीमने ...

There will be a fight in the Big Boss house today | बिग बॉसच्या घरात आज होणार कडाक्याचे भांडण

बिग बॉसच्या घरात आज होणार कडाक्याचे भांडण

र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल देखील रंगला “मिशने ए कुशन” हा टास्क. ज्यामध्ये सई आणि रेशमच्या टीमने एकमेकांचे पैसे चोरण्यासाठी बऱ्याच युक्त्या केल्या. रेशम आणि टीमने सईचे पैसे चोरल्याचे काल त्यांना कळाले नाही, परंतु सईने स्मिताचे पैसे चोरले हे मात्र स्मिताला कळाले आणि ते सई किंवा मेघानेच चोरले असे सगळ्यांसमोर तिने ठामपणे सांगितले. काल नंदकिशोर, भूषण, त्यागराज आणि उषा नाडकर्णी यांच्यामध्ये बराच वेळ संभाषण रंगले आणि नंतर त्याचे रुपांतर वादामध्ये झाले. आज देखील पुष्कर आणि नंदकिशोर मध्ये चांगलेच भांडण झाल्याचे बघायला मिळणार आहे. तसेच “मिशने ए कुशन” या टास्क मध्ये कोणाची टीम बाजी मारणार ?
 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेल्या वाईल्ड कार्ड एन्ट्री घरातील सदस्यांना न पटल्याचे त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखवले आहे. परंतु, नंदकिशोर चौघुले यांना असलेला अति आत्मविश्वास आता हळूहळू दिसून येत आहे. पन्नास दिवसानंतर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेल्या नंदकिशोर यांनी सगळ्या सदस्यांबद्दल बरीच माहिती घेऊन आल्याचा दावा तर केला आहे पण, त्यांची ही वागणूक घरामध्ये आणि घराबाहेर त्यांच्या बाजूने जाणार कि त्यांच्याविरोधात ? हे तर येणारी वेळेच सांगेल. आजदेखील नंदकिशोर आणि पुष्कर तसेच नंदकिशोर आणि मेघा, शर्मिष्ठा आणि सई मध्ये बराच वाद होताना दिसणार आहे. ज्यामध्ये नंदकिशोर यांची अरेरावीची भाषा आणि स्त्रीप्रती असलेली वर्तणूक बरोबर नाही याची जाणीव मेघा, शर्मिष्ठा आणि सई त्यांना करून देताना दिसणार आहेत. तसेच पुष्करचा राग देखील आज अनावर होणार आहे कारण नंदकिशोर यांचे आऊना वारंवार बोलणे बरोबर नाही, आणि या घरामध्ये त्यांच्याशी कोणीही असे वागलेले तो खपवून घेणार नाही, कारण “त्या मला आईसारख्या” आहेत असे पुष्कर नंदकिशोर यांना बजावून सांगताना दिसणार आहे.

 

Web Title: There will be a fight in the Big Boss house today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.