एक दीवाना था या मालिकेची टीम पडली या सदस्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 11:46 IST2017-11-10T06:16:52+5:302017-11-10T11:46:52+5:30

एक दीवाना था ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच या मालिकेच्या ...

There was a crazy team that fell in love with a member of this series | एक दीवाना था या मालिकेची टीम पडली या सदस्याच्या प्रेमात

एक दीवाना था या मालिकेची टीम पडली या सदस्याच्या प्रेमात

दीवाना था ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच या मालिकेच्या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत आहेत. या मालिकेच्या टीममधील सगळ्याच कलाकारांमध्ये खूप छान गट्टी जमली आहे. या मालिकेच्या टीममधील एक सदस्य तर प्रेक्षकांचा प्रचंड लाडका बनला आहे. हा सदस्य म्हणजे या मालिकेतील कुत्रा आहे. तो एक लॅब्राडोर असून मालिकेचे निर्माते प्रतीक शर्मा यांच्या पेट ट्रेनरचा तो कुत्रा आहे. आपल्या मालिकेसाठी एका कुत्र्याच्या शोधात असताना प्रतीकने त्याची निवड केली. या कुत्र्याचे नाव नवाब असून हा नवाब नामिक पॉल, विक्रम चौहान आणि डोनल बिस्त या कलाकारांचा दोस्त बनला आहेत. मालिकेतील सर्व कलाकार आणि सेटवरील लोक त्याचे प्रचंड लाड करतात. चित्रीकरणाच्या ब्रेकमध्ये सेटवरील लोक त्याच्यासोबत खेळताना आणि त्याचे लाड करताना दिसतात.
एक दिवाना था या मालिकेत नवाब शरण्याचा सोबती आणि शिव-शरण्यामधील दुवा असणार आहे. एक दीवाना थाचे कथानक आता अधिकच उत्कंठावर्धक होणार आहे. कारण या मालिकेत एका नव्या व्यक्तिरेखेचे आगमन होणार आहे. या मालिकेत डेलनाझ इराणीची एंट्री होणार असून ती या मालिकेत ओढणी नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेच्या आगामी भागांमध्ये व्योम शरण्याच्या प्रेमात पडणार असून तिच्याशी लवकरच लग्न करण्याचे ठरवणार आहे. परंतु राजन आणि माधवी यांच्यात एक भांडण होणार आहे. राम ओढणीची चिठ्ठी जाळून टाकणार आहे आणि शिव ती चिठ्ठी परत मिळवण्याची खटपट करणार आहे. शिव नवाबकरवी एक फुलदाणी पाडून चिठ्ठी जळण्यापासून ती वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याच वेळी शरण्याची नजर त्या चिठ्ठीवर पडणार असून त्यावर लिहिलेला आकडा तिला दिसणार आहे. दरम्यान, ओढणी भोंदू असल्याचे सांगून व्योम शरण्याला ओढणीला भेटण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. या सगळ्यामुळे मालिकेच्या आगामी भागात कथानकाला अनेक ट्विस्ट मिळणार आहेत. 
 
Also Read : ​मीडियापेक्षा अभिनयात अधिक रस असल्याने या क्षेत्राकडे वळलोः नमिक पॉल

Web Title: There was a crazy team that fell in love with a member of this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.