असं रेकॉर्ड झालं 'चंद्रविलास' मालिकेचं शीर्षकगीत सुनिधी चौहानच्या आवाजात, समोर आला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 07:00 AM2023-03-28T07:00:00+5:302023-03-28T07:00:11+5:30

चंद्रविलास' च्या निमित्ताने सुनिधी प्रथमच एखाद्या मराठी मालिकेसाठी पार्श्वगायन करतेय.

The title song of Chandravilas series was recorded in the voice of Sunidhi Chauhan, the video came out | असं रेकॉर्ड झालं 'चंद्रविलास' मालिकेचं शीर्षकगीत सुनिधी चौहानच्या आवाजात, समोर आला व्हिडीओ

असं रेकॉर्ड झालं 'चंद्रविलास' मालिकेचं शीर्षकगीत सुनिधी चौहानच्या आवाजात, समोर आला व्हिडीओ

googlenewsNext

आपल्या दमदार आवाजाने संपूर्ण बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या फिमेल सिंगर्सच्या यादीत सुनिधि चौहानचे नाव अग्रस्थानी येते. सुनिधीने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत ज्यामध्ये अनेक सुपरहिट ठरली आहेत. बॉलिवूडसोबत तिने अनेक मराठी गाणी देखील गायिली आहेत. नुकतंच तिने आगामी मालिका  'चंद्रविलास'  शीर्षकगीत गायलं हे.

सुनिधीने या आधी मराठी चित्रपटासाठी अनेकदा पार्श्वगायन केलेले आहे परंतू 'चंद्रविलास' च्या निमित्ताने सुनिधी प्रथमच एखाद्या मराठी मालिकेसाठी पार्श्वगायन करतेय. अमोल पाठारे यांच्या लेखणीतून अवतरलेलं आणि प्रणव हरिदास यांनी संगीतबद्ध केलेलं हे शीर्षकगीत गाताना ती खूप उत्साही होती.

‘चंद्रविलास’ ही गोष्ट आहे दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतो, या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा बाप लेकीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे, या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे.
 

Web Title: The title song of Chandravilas series was recorded in the voice of Sunidhi Chauhan, the video came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.