'तुम्ही ज्या गोष्टी लपवता, त्या...', बिग बॉस मराठी फेम वीणा जगतापची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:09 PM2023-06-23T12:09:41+5:302023-06-23T12:10:10+5:30

Veena Jagtap : अभिनेत्री वीणा जगतापची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

'The things you hide, those...', Bigg Boss Marathi fame Veena Jagtap's post in discussion | 'तुम्ही ज्या गोष्टी लपवता, त्या...', बिग बॉस मराठी फेम वीणा जगतापची पोस्ट चर्चेत

'तुम्ही ज्या गोष्टी लपवता, त्या...', बिग बॉस मराठी फेम वीणा जगतापची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

मराठी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. वीणा बिग बॉस मराठीच्या घरात असताना खूप चर्चेत आली होती. ती बिग बॉस मराठी शोमध्ये असताना तिच्या आणि शिव ठाकरेमध्ये प्रेम फुलले. इतकेच नाही तर घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. मात्र नंतर ते दोघे विभक्त झाले. वीणा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्री वीणा जगताप सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि त्यावरील पोस्टमुळे ती बऱ्याचदा चर्चेत येत असते. वीणाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, तुम्ही मनात ज्या गोष्टी लपवता, त्या तुमच्या डोळ्यात दिसतात. वीणाची ही पोस्ट चर्चेत आली आहे. यात वीणाने ख्रिश्चन पद्धतीचा व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. याला साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईल केली आहे. तिच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

फोटोवर चाहत्यांनी केल्या कमेंट्सचा वर्षाव
वीणा जगतापच्या पोस्टवर एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, वीणा दी आम्ही तुला नेहमी मिस करतो आणि तुमचे एकत्र राहणे. #shiveena. दुसऱ्या युजरने लिहिले की, ब्युटिफूल डॉल. आणखी एका युजरने म्हटले की, खूप सुंदर दिसत आहात. वीणाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.  वीणा जगताप बऱ्याच मोठ्या कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. मात्र ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते.

Web Title: 'The things you hide, those...', Bigg Boss Marathi fame Veena Jagtap's post in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.