'आई कुठे काय करते' मालिकेचा होणार धक्कादायक शेवट, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 16:58 IST2022-03-24T16:57:52+5:302022-03-24T16:58:46+5:30
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेचा होणार धक्कादायक शेवट, जाणून घ्या याबद्दल
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) नवीन वळणावर आली आहे. लवकरच अरुंधती आणि आशुतोषचा पहिला अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच अरुंधती आणि आशुतोषमधील मैत्री चांगलीच फुलताना दिसणार आहे. हे पुढे जाऊन लग्न देखील करणार असल्याचे समजत आहे. मात्र, मालिकेत आता पुढे मोठे वळण घेणार आहे. या मालिकेचा शेवट कसा होणार आहे, याबद्दल सांगणार आहे.
एका संकेतस्थळानुसार, आई कुठे काय करते मालिकेत लवकरच अरुंधती, आशुतोष पत्रकार परिषद घेणार आहे. पुढे हे दोघे एकत्र काम करायला लागतील. दोघांची मैत्री वाढेल. अरुंधती आशुतोष यांच्या नात्याचा शेवट मात्र इमोशनल वळणावर होणार आहे. काही दिवसांनी अरुंधती आशुतोष यांचे लग्न होईल. लग्नाच्या काही महिन्यांनी आशुतोषला गंभीर आजाराला सामोरे जावे लागेल. तो आजारपणातून लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी अंरुधती मंदिरात प्रार्थना करेल. आशुतोष मात्र अंथरुणाला खिळून असेल. अखेर आशुतोषचे निधन होईल. अरुंधतीचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. सगळे तिला सावरतील. यातून अरुंधती कशी बाहेर पडेल, हे पाहावे लागेल.
अरुंधती आशुतोषवरील सर्व शेवटचे विधी पार पाडेल. आशुतोषने जाण्याआधी सर्व प्रॉपर्टी अरुंधतीच्या नावे केलेली असेल. अरुंधती वकिलांना बोलून ही सर्व प्रॉपर्टी सुलेखा ताईंच्या नावावर करेल. याशिवाय आशुतोषने तिच्यासाठी मोठी रक्कम मागे ठेवले असते. अरुंधती ही रक्कम कॅन्सर रुग्णांवर उपचार करणाऱ्या संस्थेला दान करेल. पुढे अरुंधती सर्व गोष्टींचा त्याग करून महिलाश्रमात काम करण्यासाठी वाहून देईल आणि तिथेच मालिकेचा शेवट होईल. आई कुठे काय करते ही मालिका एका बंगाली मालिकेवर आधारित आहे.