The Kapil Sharma Show : कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची खुर्ची धोक्यात; 'या' अभिनेत्रीची होऊ शकते एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 11:45 AM2022-12-05T11:45:23+5:302022-12-05T11:46:21+5:30

कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची जागा घेणारं कोणी असेल असं वाटत नाही. 'ठोको ताली' म्हणणाऱ्या नवज्योत सिंह सिद्धू यांची हाकलपट्टी झाल्यानंतर अर्चनाने शो मध्ये चांगलाच जम बसवलाय.

the-kapil-sharma-show-who-will-take-archana-puran-singhs-place-archana-gives-reply-herself | The Kapil Sharma Show : कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची खुर्ची धोक्यात; 'या' अभिनेत्रीची होऊ शकते एंट्री

The Kapil Sharma Show : कपिल शर्मा शो मध्ये अर्चनाची खुर्ची धोक्यात; 'या' अभिनेत्रीची होऊ शकते एंट्री

googlenewsNext

The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' मध्ये अर्चना पुरण सिंह मुळे आणखीनच मजा येते. जोरजोरात हसणाऱ्या अर्चनाची कपिलही खुप खेचतो. या शो मध्ये अर्चना ची जागा घेणारं कोणी असेल असं वाटत नाही. 'ठोको ताली' म्हणणाऱ्या नवज्योत सिंह सिद्धू यांची हाकलपट्टी झाल्यानंतर अर्चनाने शो मध्ये चांगलाच जम बसवलाय. पण आता अर्चना ची जागा कोण घेऊ शकते याचा खुलासा स्वत: अर्चनानेच केला आहे. (Archana Puran Singh)

नुकत्याच झालेल्या कपिल शर्मा च्या एपिसोडमध्ये अभिनेत्री काजोलने हजेरी लावली. तिच्या आगामी (Salam Venky) 'सलाम व्हेंकी'च्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती शो मध्ये आली होती. आता काजोलचा स्वभाव सगळ्यांना माहितच आहे. बडबडी आणि दिलखुलास हसणाऱ्या काजोलमुळे शो मध्ये धमाल आली. दरम्यान कोणापासून तुझ्या खुर्चीला धोका आहे यावर अर्चना ने सिद्धुचे नाव न घेता काजोलचेच नाव घेतले आहे. अर्चना ला वाटते बबली गर्ल काजोलच कपिल शर्मा शो मधील तिची खुर्ची घेऊ शकते. त्यामुळे भविष्यात अर्चनाच्या जागी काजोल दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

The Kapil Sharma Show Kajol to Replace Archana Puran Singh For These Reasons - Entertainment News India -

Singer Lucky Ali : लकी अली यांच्या जमिनीवर भु-माफियांचे अतिक्रमण; महिला आयएएस अधिकारीही सामिल; पोस्ट व्हायरल

कपिल शर्मा शो मध्ये सलाम व्हेंकीतील मुख्य कलाकार विशाल जेठवा आणि दिग्दर्शिका रेवती हे देखील आले होते. सगळ्यांनी नेहमीसारखीच धमाल केली. काजोल म्हणते, जेव्हा मी या शो मध्ये येते तेव्हा इतकी हसते की माझे गाल दुखायला लागतात. ३ तास नॉनस्टॉप कशी काय हसू शकते. काजोलला कॉम्प्लिमेंट देताना अर्चना म्हणाली, ' काजोलशिवाय माझी खुर्ची कोणीच घेऊ शकत नाही.'

Web Title: the-kapil-sharma-show-who-will-take-archana-puran-singhs-place-archana-gives-reply-herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.