'आई तुळजाभवानी' मालिकेत षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 17:58 IST2025-10-21T17:58:23+5:302025-10-21T17:58:41+5:30
Aai Tulja Bhavani Serial : 'आई तुळजाभवानी' मालिकेत घेऊन येत आहे एक थरारक आणि भव्य दैवी प्रवास. जिथे षड्रिपु मत्सर रूपी उमा आणि तिच्या सोबत पाच षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष उलगडेल.

'आई तुळजाभवानी' मालिकेत षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष
कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी 'आई तुळजाभवानी' मालिकेत घेऊन येत आहे एक थरारक आणि भव्य दैवी प्रवास. जिथे षड्रिपु मत्सर रूपी उमा आणि तिच्या सोबत पाच षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष उलगडेल. यंदाच्या दिवाळीत सोमवार २० ते शनिवार २५ ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांना दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर हा भव्य संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मराठी टेलिव्हिजनवर अप्रतिम ग्राफिक्सचा कथानक सादर करण्यासाठी चपखल वापर करून प्रेक्षकांना नेत्रसुखद दृश्य अनुभव देणारी ही आजवरची एकमेव मालिका ठरली असून, त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मालिकेच्या याच अद्भुत ग्राफिक्स वैशिष्ट्याचा महा-आविष्कार या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. एका पर्वतकड्यावर उभ्या षड्रिपु मत्सर रूपी उमा. तिच्या मागे मोठ्या रूपातील मत्सर, तर बाजूला पाच षड्रिपु. एकाक्षणात हे सगळे रिपू उमामध्ये एकत्र होतात, आणि उमा प्रचंड महाकाय, महारिपूचे रूप धारण करते.
षड्रिपु मत्सर रूपी उमा षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा अद्भुत महासामना
समांतर दृश्यात जगदंबा दिसते, तिच्या पाठीमागे विजेच्या कल्लोळात आई तुळजाभवानी प्रकट होते. जगदंबेच्या मस्तकावर उभा डोळा उघडतो, आणि त्यातून दैवी किरण बाहेर पडतात. ते किरण सहा रिपूंना स्पर्श करून त्यांना हवेत विरघळवतात आणि लालसर-केशरी, जळत्या षटकोणात रिपूंचे रुपांतर होते. त्या षटकोणाकडे रोखून पाहणाऱ्या जगदंबा आणि तुळजाभवानी, आणि त्यांच्या समोर षड्रिपु मत्सर रूपी उमा षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा अद्भुत महासामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.