'तू चाल पुढं' मालिकेत अश्विनी पार्लरमधील जेनिफरची भूमिका साकारलीय या अभिनेत्रीनं, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 07:00 AM2023-08-12T07:00:00+5:302023-08-12T07:00:00+5:30

'तू चाल पुढं' मालिकेत अनेक कठीण प्रसंगात जेनिफर अश्विनीसोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे ही जेनी प्रेक्षकांनाही विशेष भावली आहे.

The actress played the role of Jennifer in Ashwini Parlor in the serial 'Tu Chal Pudham', know about her | 'तू चाल पुढं' मालिकेत अश्विनी पार्लरमधील जेनिफरची भूमिका साकारलीय या अभिनेत्रीनं, जाणून घ्या तिच्याबद्दल

'तू चाल पुढं' मालिकेत अश्विनी पार्लरमधील जेनिफरची भूमिका साकारलीय या अभिनेत्रीनं, जाणून घ्या तिच्याबद्दल

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तू चाल पुढंने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत गृहिणी ते यशस्वी उद्योजिका म्हणून अश्विनीचा प्रवास रेखाटण्यात आला आहे. या मालिकेतील सर्व पात्रं घराघरात पोहचली आहेत. अश्विनीला तिच्या या यशाच्या प्रवासात अनेकांची साथ मिळाली आहे. तिच्या पार्लरमधली सहाय्यक जेनिफर ही देखील त्यातलीच एक. अनेक कठीण प्रसंगात जेनिफर अश्विनीसोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे ही जेनी प्रेक्षकांनाही विशेष भावली आहे. जेनिफरची भूमिका अभिनेत्री सेंजाली राजीव मसंद हिने साकारली आहे. 

सेंजाली ही गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. ती मूळची वेलनेश्वर रत्नागिरीची आहे. तिचे कुटुंब विरारमध्ये वास्तव्यास आहे. इथेच ती लहानाची मोठी झाली आहे. विरारमध्ये शालेय शिक्षण आणि मुंबईच्या मालाड SNDT कॉलेजमध्येच त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.अभिनयाची आवड आधीपासून होते. का रे दुरावा, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, लक्ष्य, गाव एक भानगडी, फुलपाखरू अशा लोकप्रिय मालिकेतून सेंजाली मसंदने छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत.


सेंजालीने सॉल्ट शुगर अँड प्रेम या चित्रपटातही काम केले आहे.. मराठीत अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारल्यानंतर सोनी सबवरील वागळे की दुनिया या हिंदी मालिकेतही ती झळकली आहे. सेंजाली मसंद खऱ्या आयुष्यात जेनिफर इतकीच स्टायलिश आहे.

Web Title: The actress played the role of Jennifer in Ashwini Parlor in the serial 'Tu Chal Pudham', know about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.