'आई कुठे काय करते'मधील हा कलाकार झळकणार रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 09:00 AM2022-06-23T09:00:00+5:302022-06-23T09:00:00+5:30

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मधील हा कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

The actor from 'Aai Kuthe Kay Karte' will appear on the silver screen | 'आई कुठे काय करते'मधील हा कलाकार झळकणार रुपेरी पडद्यावर

'आई कुठे काय करते'मधील हा कलाकार झळकणार रुपेरी पडद्यावर

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अनिरुद्ध, अरुंधती, ईशा, यश, अभिषेक, अनघा, गौरी, आप्पा, कांचन आई, संजना आणि शेखर या कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. याशिवाय सध्या या मालिकेत आशुतोषने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आशुतोषची भूमिका अभिनेता ओंकार गोवर्धन (Omkar Govardhan) याने साकारली आहे. या भूमिकेतून अभिनेता रसिकांच्या मनात घर केले आहे. ओंकार गोवर्धनच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. तो लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे वाय.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या प्रचंड चर्चेत असलेला आणि मुक्ता बर्वे ची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजेच वाय! वाय सिनेमात अभिनेता ओंकार गोवर्धन हा महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

या चित्रपटाबद्दल ओंकार म्हणाला की, वाय हा सामाजिक चित्रपट आहे. त्यासोबतच तो थरारपटदेखील आहे. वायची स्क्रीप्ट वाचल्यानंतर साधारण मी पाचव्या मिनिटाला चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. कारण मला ती स्क्रीप्ट खूप आवडली. मी त्यात गुंतून गेलो होतो. यात मी अर्जुन नामक तरूणाची भूमिका साकारतो आहे. तो एका सामाजिक संस्थेत काम करतो आहे. आशुतोषपेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे आणि प्रेक्षकांना ही नक्कीच आवडेल, अशी मला आशा आहे.


वाय या चित्रपटात ओंकार गोवर्धनसोबत मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, नंदू माधव, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले हे कलाकार दिसणार आहे. हा चित्रपट २४ जूनला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The actor from 'Aai Kuthe Kay Karte' will appear on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.