अभिनेत्रीच्या निधनाची पसरली होती अफवा, म्हणाली- 'चमत्कार ! पण मी अजून जिवंत..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:28 AM2023-09-28T10:28:59+5:302023-09-28T10:45:13+5:30

अलिकडेच अभिनेत्रीच्या मृत्यूची अफवा पसरवण्यात आली होती. त्यानंतर आपण जीवंत असल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

Thapkin pyar ki fame actress jigyasa singh rejected the rumors of her death said guys i am alive | अभिनेत्रीच्या निधनाची पसरली होती अफवा, म्हणाली- 'चमत्कार ! पण मी अजून जिवंत..

अभिनेत्रीच्या निधनाची पसरली होती अफवा, म्हणाली- 'चमत्कार ! पण मी अजून जिवंत..

googlenewsNext

 'थपकी प्यार की' फेम अभिनेत्री जिज्ञासा सिंग सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे. अलीकडे, अभिनेत्रीच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. अभिनेत्रीने आता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. जिज्ञासाने काही YouTube व्हिडिओंचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत ज्यात तिच्या मृत्यूबद्दल खोट्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

जिज्ञासा आपल्या मृत्यूच्या अफवा पसरवणार्‍यांवर चांगलीच संतापली आहे. आपण जीवंत असून लोकांनी अशा खोट्या बातम्या पसरवणे थांबवण्याचे आवाहन तिनं केले. जिज्ञासाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हे लोक कोण आहेत जे हे पसरवत आहेत? चमत्कार ! पण मी जिवंत आहे त्यामुळे अशा खोट्या बातम्या पसरवणं थांबवावं.” आपल्या मृत्यूबद्दलच्या या अफवा वाचून अभिनेत्रीला धक्का बसला आणि तिने अशा निरधारित अफवांवर विश्वास ठेवू नये असं सांगितलं.  


 
जिज्ञासा सिंगने 'थपकी प्यार की' या मालिकेत थपकीची भूमिका साकारली होती आणि या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. या शोमधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. यानंतर ती शोच्या सीझन 2 देखील झळकली होती. तिच्या प्रकृतीच्या समस्येमुळे, तिला मालिका अर्धवट सोडावी लागली. रुबिना दिलैकने शक्ती: अस्तित्व के एहसास ही मालिका सोडल्यानंतर,जिज्ञासाची या मालिकेत एंट्री झाली होती.  शोमधील तिची सिम्पा नागपालसोबतची  केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Web Title: Thapkin pyar ki fame actress jigyasa singh rejected the rumors of her death said guys i am alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.