​तेरे मेरे सपने फेम एकता तिवारी आणि सुशांत कंड्याने केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 16:29 IST2017-06-15T10:59:56+5:302017-06-15T16:29:56+5:30

तेरे मेरे सपने या मालिकेत एकता तिवारीने राधा ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला ...

Tere Mere Sapne Fame Ekta Tiwari and Sushant Kanti Kya Chakrabad | ​तेरे मेरे सपने फेम एकता तिवारी आणि सुशांत कंड्याने केला साखरपुडा

​तेरे मेरे सपने फेम एकता तिवारी आणि सुशांत कंड्याने केला साखरपुडा

रे मेरे सपने या मालिकेत एकता तिवारीने राधा ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनंतर तिने अनेक मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. ती सध्या क्राइम पेट्रोल या मालिकेत आपल्याला अनेकवेळा पाहायला मिळत आहे तर सुशांत कंड्याने बदलापूर बॉईज या चित्रपटात काम केले होते. त्या दोघांनी नुकताच साखरपुडा केला. त्या दोघांनी धुमधडाक्यातच नव्हे तर अतिशय साधेपणाने साखरपुडा केला.
एकता आणि सुशांत यांची ओळख क्राइम पेट्रोल या कार्यक्रमाच्याच सेटवर झाली होती. त्यांनी या कार्यक्रमाच्या अनेक भागांमध्ये एकत्र काम केले आहे. याविषयी एकता सांगते, क्राइम पेट्रोल या मालिकेचे आम्ही जवळजवळ सात भागांचे लागोपाठ चित्रीकरण केले होते. चित्रीकरण करत असताना आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो हेच आम्हाला कळले नाही. काही कळायच्या आतच आम्ही एकमेकांच्या प्रेमात बुडालेलो होतो. आम्ही दोघांपैकी कोणीच कोणाला प्रपोज केले नाही. तसेच साखरपुडा देखील करण्याचे आम्ही अचानक ठरवले. आम्ही दोघेही सध्या खूप खूश असून आम्ही भविष्यात होणाऱ्या चांगल्या गोष्टींची वाट पाहात आहोत. तसेच लग्नाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर जानेवारी अथवा फेब्रुवारी पर्यंत लग्न करण्याचा आमचा विचार आहे. पण तोपर्यंत लग्न न झाल्यास पुढील काळात कधी लग्न करायचे हे आम्ही ठरवलेले नाही. आम्ही ते नशिबावर सोडण्याचे ठरवले आहे. 
एकताने तिच्या आणि सुशांतच्या साखरपुड्याचे फोटो सोशल नेटवर्किंगला शेअर केले आहेत.  या फोटोला अनेकजणांच्या लाइक्स मिळत आहेत. 

Web Title: Tere Mere Sapne Fame Ekta Tiwari and Sushant Kanti Kya Chakrabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.