टास्क दरम्यान घरातील 'या' सदस्यांमध्ये आज होणार वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 06:10 AM2018-06-15T06:10:45+5:302018-06-15T11:41:56+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांसाठी डाबर रेड पेस्ट प्रस्तुत “हेल्थी स्माईल” या स्पर्धेचे ...

Task between the members of the 'House' | टास्क दरम्यान घरातील 'या' सदस्यांमध्ये आज होणार वाद

टास्क दरम्यान घरातील 'या' सदस्यांमध्ये आज होणार वाद

googlenewsNext
र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांसाठी डाबर रेड पेस्ट प्रस्तुत “हेल्थी स्माईल” या स्पर्धेचे आयोजन केले. या कार्या अंतर्गत सदस्यांची तीन टीम मध्ये विभागणी करण्यात आली. टीम A – दात, टीम B डाबर रेड पेस्ट आणि टीम C कॅव्हिटी. टीम Aला म्हणेच दातांना टीम C मधील सदस्यांपासून म्हणजेच कॅव्हिटी पासून वाचविण्याची टीम B ची जबाबदारी होती. “हेल्थी स्माईल” या नव्या टास्क मध्ये डाबर रेड पेस्ट ही टीम विजयी ठरली म्हणजेच मेघा, पुष्कर आणि आस्ताद. आणि आता या तिघांमध्ये आज रंगणार कॅप्टनसीचे कार्य. तेव्हा बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण बनणार ? 
 

आजच्या कॅप्टनसीच्या टास्क मध्ये कोणाला घराचा कॅप्टन करायचा यावरून आस्ताद, रेशम, स्मिता मध्ये बरीच चर्चा होणार आहे. तसेच घरामध्ये सगळे मिळून भज्या करणार आहेत. कॅप्टन तोच होणार जो विजयाचा झेंडा रोवणार. पूर्वीच्या काळी प्रतिस्पर्धी राज्यावर सत्ता प्रस्थापित केल्यावर तिथे झेंडा फडकविण्याची प्रथा होती. थोडक्यात प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करून त्याच्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झेंड्याचा प्रतीकात्मक वापर होत असे. कॅप्टनसीच्या कार्यात या झेंड्याची महत्वाची भूमिका असेल. या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्यासाठी मेघा, आस्ताद आणि पुष्कर हे तीन उमेदवार मैदानात उभे आहेत. या तिघांमध्ये सरस ठरत कोण आपल्या विजयाचा ध्वज फडकावतो हे बघण्यासाठी बिग बॉस यांनी “ध्वज विजयाचा उंच धरा रे” हे कॅप्टनसीचे कार्य सदस्यांवर सोपवणार आहेत. या टास्कमध्ये नंदकिशोर, शर्मिष्ठा, आस्ताद आणि मेघा मध्ये बरेच वाद होताना बघायला मिळणार आहेत.

Web Title: Task between the members of the 'House'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.