तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार पिंकूचे पालक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 12:33 IST2018-01-29T07:03:26+5:302018-01-29T12:33:26+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षं सुरू असली तरी या मालिकेतील अनेक प्रश्न आजही प्रेक्षकांना ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार पिंकूचे पालक?
त रक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षं सुरू असली तरी या मालिकेतील अनेक प्रश्न आजही प्रेक्षकांना सतावत आहेत. या मालिकेतील पोपटलालचे लग्न कधी होणार, तसेच पिंकूचे पालक कोण आहेत या प्रश्नांची उत्तरं आजही प्रेक्षकांना मिळालेली नाहीत. पण पिंकूचे पालक कोण आहेत याचा आता शोध टप्पूसेना घेणार आहेत. पिंकू आपल्या पालकांविषयी काहीतरी लपवत आहे हे टप्पूसेनाच्या लक्षात आले आहे आणि त्यामुळे त्याचे घर शोधण्यासाठी त्यांनी पिंकूचा पाठलाग देखील केला. पण या सगळ्यांची दिशाभूल करत पिंकू निघून गेला. आता पिंकूच्या घराचा पत्ता टप्पूसेनाने शोधला आहे. पण त्याने तिथे देखील पिंकूला भेटला आले नाही. त्यामुळे आता पिंकूचे पालक कोण आहेत याचा काही केल्या शोध लावायचा असे टप्पू सेनाने ठरवले आहे आणि या त्यांच्या मिशनमध्ये गोकुळधामवासीय देखील त्यांना साथ देत आहेत.
गोकुळधाम सोसायटीत नेहमीच सगळे सण धुमधडाक्यात साजरे केले जातात. आता प्रजासत्ताक दिन देखील गोकुळधाम मधील मंडळी उत्साहात साजरे करणार आहेत आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात पिंकूला त्याच्या पालकांसोबत येण्याचे निमंत्रण टप्पू सेना देणार आहे. पण आता पिंकू टप्पूसेनाला फसवण्याचे ठरवणार आहे. पिंकूचे आई वडील कोण आहेत याविषयी टप्पू सेनाला माहीत नसल्याने पिंकू त्यांच्याशी खोटे बोलणार आहे आणि खोट्या पालकांना घेऊन गोकुळधाम सोसायटीत जाणार आहे. तो त्याच्या घरातील नोकराणी आणि स्वयंपाकी यांना आई वडील म्हणून घेऊन जाणार आहे. पिंकू अशाप्रकारे का वागत आहे? त्याचे पालक त्याच्यासोबत का राहात नाहीत? पालकांविषयी खोटे बोलण्याबाबत कारण काय आहे? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना मिळणार आहेत.
गोकुळधाममधील लोकांना पिंकूने आपल्या खोट्या पालकांना भेटवल्यानंतर ते पिंकूचे पालक नाहीत हे गोकुळधामवासीय ओळखणार की टप्पू सेना आणि गोकुळधामवासीयांना फसवण्यात पिंकू यशस्वी होणार हे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये कळणार आहे. पिंकूच्या या खोट्या पालकांमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे.
Also Read : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत या महिन्यात परतणार दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी