तारक मेहताच्या सेटवर झाला कोरोनाचा शिरकाव, या अभिनेत्यांना झाली कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 10:52 AM2021-03-20T10:52:56+5:302021-03-20T10:55:51+5:30

तारक मेहतामधील दोन कलाकारांना कोरोनाची लागण झाली असून इतर कलाकार आणि तंत्रज्ञांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

tarak mehta ka ooltah chashmah's mayur vakani and mandar chandwadkar tests covid 19 positive | तारक मेहताच्या सेटवर झाला कोरोनाचा शिरकाव, या अभिनेत्यांना झाली कोरोनाची लागण

तारक मेहताच्या सेटवर झाला कोरोनाचा शिरकाव, या अभिनेत्यांना झाली कोरोनाची लागण

googlenewsNext
ठळक मुद्देमयुर आणि मंदार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सगळ्याच कलाकार आणि तंत्रज्ञांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

तारक मेहतामध्ये सुंदरच्या भूमिकेत असलेल्या मयूर वाकाणी आणि भिडेच्या भूमिकेत असलेल्या मंदार चांदवडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मयुरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मंदार सध्या होम क्वॉरंटाईन आहे. मयुर आणि मंदार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सगळ्याच कलाकार आणि तंत्रज्ञांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सुंदर आपल्याला खूपच कमी भागात पाहायला मिळतो. पण गेल्या काही दिवसांपूर्वी जेठालालचे पैसे भोगीलाल नावाचा एक व्यवसायिक देत नसतो. त्यामुळे जेठालाल त्याची गावातील जमीन विकण्याचे ठरवतो. या कथानकात सुंदरने महत्त्वाची भूमिका बजावली होती तर मंदार तारक मेहता का उल्टा चष्माच्या प्रत्येक भागात असतो. 

मयुर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या चित्रीकरणानंतर अहमदाबादला त्याच्या घरी परत गेला होता. तिथे त्याला कोरोनाची लक्षणं जाणवल्यानंतर त्याने कोरोनाची टेस्ट करून घेतली. त्याला आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असून मयुरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर त्याची पत्नी होम क्वॉरंटाईन आहे.

तर मंदारने कोरोनाची टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट यायच्या आधीच स्वतःला आयसोलेट केले होते. त्याची तब्येत चांगली असून त्याला कोणताही प्रकारचा त्रास होत नसल्याने तो सध्या होम क्वॉरंटाईन आहे. 

Web Title: tarak mehta ka ooltah chashmah's mayur vakani and mandar chandwadkar tests covid 19 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.