तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये भिडेने केले दुसरे लग्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 14:48 IST2021-01-09T14:45:05+5:302021-01-09T14:48:58+5:30

भिडेने दुसरे लग्न करताना सोनू आणि माधवीचा विचार कसा केला नाही असा विचार करून जेठालाल भिडेवर चिडला आहे.

tarak mehta ka ooltah chashmah aatmaram bhide married second time? | तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये भिडेने केले दुसरे लग्न?

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये भिडेने केले दुसरे लग्न?

ठळक मुद्देआत्माराम तुकाराम भिडेने पोपटलालच्या बाल्कनीत एक दाक्षिणात्य महिला पाहिली असून या महिलेसोबत पोपटलालने लग्न केले असा समज गोकुळधामवासियांना झाला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका होती. पण त्यांच्या पहिल्याच मालिकेने त्यांना खूप फेमस बनवले. आज जेठालाल, दया, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक मेहता, अंजली, अय्यर, बबिता, टप्पू, पोपटलाल, नट्टू काका या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.

या मालिकेतील पोपटलाल तर प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. या मालिकेत आपल्याला पोपटलालच्या भूमिकेत श्याम पाठकला पाहायला मिळते. पोपटलाल हा एक पत्रकार असून त्याच्या हातात आपल्याला नेहमी एक छत्री पाहायला मिळते. पोपटलाल हा लग्नासाठी प्रचंड उत्सुक असतो. प्रत्येक मुलीला आपकी शादी हुई क्या असे तो विचारत असतो. पोपटलालचे लग्न कधी होणार असा प्रश्न नेहमीच त्याच्या चाहत्यांना पडलेला असतो. पण आता पोपटलालचे लग्न झाले असून त्याच्या पत्नीला घेऊन तो गोकुळधामला आला आहे असे गोकुळधामवासियांना वाटत आहे. 

आत्माराम तुकाराम भिडेने पोपटलालच्या बाल्कनीत एक दाक्षिणात्य महिला पाहिली असून या महिलेसोबत पोपटलालने लग्न केले असा समज गोकुळधामवासियांना झाला आहे. पोपटलालने कोणाला न सांगता लग्न केले याचा सोढीला राग आला आहे. तर दुसरीकडे जेठालालला गैरसमज झाला आहे की, भिडेने दुसरे लग्न केले आहे. भिडेने दुसरे लग्न करताना सोनू आणि माधवीचा विचार कसा केला नाही असा विचार करून जेठालाल भिडेवर चिडला आहे. या सगळ्या गोंधळामुळे तारक मेहता का उल्टा चष्माच्या प्रेक्षकांना खळखळून हसण्याची संधी मिळणार आहे. खरंच पोपटलालने लग्न केले आहे की, यावेळी देखील प्रेक्षकांची निराशा होणार हे प्रेक्षकांना ही मालिका पाहिल्यावरच कळेल.

Web Title: tarak mehta ka ooltah chashmah aatmaram bhide married second time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.