‘जीजी माँ’मालिकेसाठी तन्वी डोग्राने साकारला रोहित शेट्टीप्रमाणे स्टंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 11:08 IST2017-11-21T05:38:13+5:302017-11-21T11:08:13+5:30

‘जीजी माँ’ ही एक कौटुंबिक सूडकथा असून तिची अनोखी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेत लवकरच एक रोहित ...

Tanvi Dogra has made a stunt for Rohit Shetty for the 'GG Ma'am | ‘जीजी माँ’मालिकेसाठी तन्वी डोग्राने साकारला रोहित शेट्टीप्रमाणे स्टंट!

‘जीजी माँ’मालिकेसाठी तन्वी डोग्राने साकारला रोहित शेट्टीप्रमाणे स्टंट!

ीजी माँ’ ही एक कौटुंबिक सूडकथा असून तिची अनोखी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेत लवकरच एक रोहित शेट्टीसारखा थरारक स्टंट प्रसंग साकारण्यात येणार असून तो मालिकेची नायिका तन्वी डोग्रा साकारणार आहे.या स्टंट प्रसंगात तन्वी (फाल्गुनी पुरोहित) ही बाइकवरून जात असून तिच्या मागे पल्लवी प्रधान (उत्तरादेवी) बसलेली असते.यावेळी तन्वी आपल्या बाइकसह एका मोटारीवरून उडी मारते आणि बाइक तशीच घेऊन जाते, असे दाखविण्यात आले आहे.असे थरारक स्टंट प्रसंग साकारण्यात रोहित शेट्टीचा हातखंडा असून जीजी माँसारख्या कौटुंबिक मालिकेत अशा स्टंट प्रसंगाने कर्मचा-यांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला होता.हवामान प्रतिकूल असतानाही या प्रसंगाचे यशस्वीरीत्या चित्रण करण्यात आले असून कलाकार आणि तंत्रज्ञांनी खूप मेहनतीने हा प्रसंग अस्सल वाटेल, अशा पध्दतीने चित्रीत केला आहे. या प्रसंगात सुरुवातीला तन्वीच्या मागे बसण्यास पल्लवी प्रधानने नकार दिला होता; परंतु तन्वीचे ड्रायव्हींग चागले असल्याचे विश्वास बसल्यावरच या स्टंटसाठी पल्लवी तयारी झाली.यासंदर्भात तन्वीने सांगितले की,“मला वाटलं मी बाइक  हवेत उड्या मारत असलेल्या रोहित शेट्टीच्याच एखादा प्रसंगच काम करत आहे. हा स्टंट उत्तमपणे साकारण्यात आला आहे.त्याचं चित्रीकरण करताना मला खूपच मजा आली. रोहित शेट्टीच्या एखाद्या स्टंट प्रसंगात काम करावं, असं मला वाटत आलं होतं.ते स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे.”हा स्टंट करताना कोणालाही दुखापत होणार नाही,याची दक्षता निर्मात्यांनी घेतली होती.तन्वी आणि पल्लवीला हा स्टंट साकारताना पाहून प्रेक्षकांनाही सुखद धक्का असणार असल्याचे या दोघींनीही सांगितले.

अभिनय करणे प्रत्येक कलाकारसाठी आव्हानात्मक असेत. शेवटी  आपल्या आपल्या अभिनयातून रसिकांचे मनोरंजन होणे हेच महत्त्वाचे असते.प्रत्येक कलाकार आपापल्या अभिनयकौशल्याने रसिकांची मनं जिंकण्याचे प्रत्येकवेळी प्रयत्न करत असतो. त्यातही अनेक प्रकारच्या अभिनयगुणांनी परिपूर्ण असलेल्या या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणे हे तर अधिकच अवघड आहे.म्हणूनच ‘जीजी माँ’ मालिकेत उत्तरादेवीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री पल्लवी प्रधान हिचा रंगमंचावर काम केल्यानंतर  टीव्ही मालिकांकडे वळल्या.एकांकिका आणि नाटकांतून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस प्रारंभ केलेल्या पल्लवी प्रधानला पहिल्या मानधनापोटी केवळ 75 रुपयांचा धनादेश मिळाला होता. तीन तासांच्या चित्रपटासाठी शेकडो रुपये मोजावे लागण्याच्या काळात केवळ 75 रुपयांवरून प्रारंभ करून रंगमंचाकडून रुपेरी पडद्याच्या दिशेने केलेला व्यावसायिक प्रवास आणि यादरम्यान कमावलेले नाव ही तिची मोठीच कमाई म्हणावी लागेल.पल्लवी प्रधान ही एक उत्तम अभिनेत्री असून तिनं फक्त मराठी रंगमंचच नाहीतर गुजराती रंगमंचही गाजवला आहे. 

Web Title: Tanvi Dogra has made a stunt for Rohit Shetty for the 'GG Ma'am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.