रविवारी सुटी घ्यायला आवडते,पण चित्रीकरणाकडे दुर्लक्ष करून नव्हे- कृतिका कामरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 14:50 IST2017-06-13T09:20:16+5:302017-06-13T14:50:16+5:30

कलाकारांना त्यांच्या शूटिंगमुळे जास्त दिवस सुट्टी घ्यायला मिळत नाही. आठवड्याभरात जोमाने शूटिंग केल्यानंतर एक दिवस तरी सुट्टी मिळावी त्यात ...

Like to take holidays on Sundays, but not ignoring the filming - Kritika Kamra | रविवारी सुटी घ्यायला आवडते,पण चित्रीकरणाकडे दुर्लक्ष करून नव्हे- कृतिका कामरा

रविवारी सुटी घ्यायला आवडते,पण चित्रीकरणाकडे दुर्लक्ष करून नव्हे- कृतिका कामरा

ाकारांना त्यांच्या शूटिंगमुळे जास्त दिवस सुट्टी घ्यायला मिळत नाही. आठवड्याभरात जोमाने शूटिंग केल्यानंतर एक दिवस तरी सुट्टी मिळावी त्यात कुटुंबासह वेळ घालवता यावा यामुळे रविवारची सुट्टी मिळाली तर सोने पे सुहागाच समजा.मात्र कलाकरांना कधी कधी रविवारी शूटिंग करावे लागते. ‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी कृतिका कामराने रविवारी चित्रीकरण करण्यास नकार दिल्याच्या वृत्ताने आज दिवसभर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली होती.कृतिकाने रविवारच्या दिवशी चित्रीकरण करण्यास नकार दिला असून त्या दिवशी निर्मात्यांना ड्य़ुप्लिकेट कलाकार घेऊन तिच्या प्रसंगांचे चित्रीकरण करावे लागले, अशी चर्चा आज दिवसभर सुरू होती. परंतु स्वत: कृतिका कामराने आपल्या ट्विट करत सा-या अफवांचे खंडन केले आहे. कृतिका कामराने सोशल मीडियावर म्हटले की,“मला रविवारी सुटी घ्यायला आवडते. परंतु ज्यावेळी काम असते तेव्हा मी सुट्टी घेत नाही. मी शूटिंगसाठी सेटवर गैरहजर आहे असे एकदाही झाले नाहीय. माझ्या सुट्टीमुळे निर्मात्यांना आजपर्यंत एकदाही माझी ड्य़ुप्लिकेट कलाकार घेऊन शूटिंग करावे लागलेले नाही.” मात्र सूत्राने दिलेल्या माहितीनुसार “कृतिकाने रविवारी शूटिंगला नकार दिल्यामुळे  निर्मात्यांनी तिची ड्य़ुप्लिकेट कलाकार वापरून शूटिंग  केल्याची अफवा आज दिवसभर सुरू होती. पण या सर्व खोट्य़ा बातम्या होत्या. कृतिका ही एक व्यावसायिक अभिनेत्री आहे. तिला आपले सर्व प्रसंग स्वत:च साकारावयास आवडतात आणि अगदी अवघड, धाडसी प्रसंगातही ड्य़ुप्लिकेट कलाकाराचा वापर करण्यास तिने नकार दिलेला आहे.” कृतिकाबरोबरचा कामाचा अनुभव सांगताना निर्माते निखिल सिन्हा म्हणाले, “कृतिका कामराइतकी मेहनत घेणारी अभिनेत्री मी आजपर्यंत पाहिलेली नाही. ती अतिशय वक्तशीर आणि शिस्तबध्द कलाकार आहे.तिने आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारणं सांगत कामातून पळ काढलेला नाहीय. ती आपले सर्व प्रसंग अतिशय तन्मयतेने आणि समर्पित भावनेने पार पाडते. तिच्यामुळे आजपर्यंत मालिकेच्या कामाचं नुकसान झालेलं नाही. ती एक अत्यंत प्रोफेशनल  आहे.त्यामुळे कृतिका विषयीच्या सगळ्या बातम्या या निव्वळ अफवा असल्याचे मालिकेच्या टीमने स्पष्ट केले आहे. 


Web Title: Like to take holidays on Sundays, but not ignoring the filming - Kritika Kamra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.