Nidhi Bhanushali Bikini Look: 'तारक मेहता...'मधल्या भिडे मास्तरांच्या सोनूचा भलताच बोल्ड अंदाज, 'बिकीनी लूक'मधील Video केला पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 06:43 PM2022-09-27T18:43:58+5:302022-09-27T18:45:33+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Nidhi Bhanushali Bikini Photos : 'तारक मेहता..' फेम निधी भानुशालीने पोस्ट केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah star Nidhi Bhanushali aka Sonu Bhide Bold Bikini Photos Videos goes viral | Nidhi Bhanushali Bikini Look: 'तारक मेहता...'मधल्या भिडे मास्तरांच्या सोनूचा भलताच बोल्ड अंदाज, 'बिकीनी लूक'मधील Video केला पोस्ट

Nidhi Bhanushali Bikini Look: 'तारक मेहता...'मधल्या भिडे मास्तरांच्या सोनूचा भलताच बोल्ड अंदाज, 'बिकीनी लूक'मधील Video केला पोस्ट

googlenewsNext

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Nidhi Bhanushali Bikini Photos : तारक मेहता का उल्टा चष्मा हा अशा टीव्ही कॉमेडी शोपैकी एक आहे जो प्रेक्षकांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह पाहायला आवडतो. या शो ने १५ वर्षांपासून टीव्हीसह टीआरपीच्या यादीतही आपले स्थान टिकवून ठेवले आहे. या शो ची केवळ कथाच नाही, तर त्यातील पात्रदेखील प्रेक्षकांच्या आवडीची आहेत. या शो मध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली पण आज ते खूप मोठे झाले आहेत. अशीच एक कलाकार म्हणजे सोनू भिडे. तारक मेहतामध्ये सोनूची भूमिका अभिनेत्री निधी भानुशालीने साकारली होती. पण सध्या ती तिच्या ट्रॅव्हल व्लॉग्स आणि बोल्ड लूकमुळे जास्त चर्चेत असते.

आज भलेही ती या शो चा भाग नसेल, पण आजही चाहते तिला भरभरून प्रेम देतात. सध्या निधीने अभिनयापासून दूर राहणेच पसंत केले आहे. ती सध्या मित्रांसोबत टूरवर गेली असून भ्रमंती करताना दिसत आहे. निधी तिच्या अँडव्हेंचर टूर्सचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी जोडलेली राहते. याच दरम्यान, तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती समुद्राच्या लाटांशी खेळताना दिसत आहे. निधीने तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये लाटांवर स्वार असून तिने बिकिनी घातली आहे. या बिकीनी लूक मध्ये निधी खूपच बोल्ड दिसत आहे. तिच्या या व्हिडिओमध्ये ती काही वेळा समुद्रात तर काही वेळी उभी राहून पोज देताना दिसत आहे. तसेच तिच्यासोबत तिचे अनेक मित्रही दिसत आहेत. पाहा निधीचा हा बिकीनी लूक वाला व्हिडीओ-

या व्हिडिओमध्ये निधीचा बोल्डनेस पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ अनेक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर यावर कमेंट करून चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, 'सोनू आता खूपच बदलली आहे.' तर दुसऱ्याने लिहिले आहे, 'भिडे मास्तरांची मुलगी आता खूप मोठी झालेली दिसतेय.'

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah star Nidhi Bhanushali aka Sonu Bhide Bold Bikini Photos Videos goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.