अरे हे कोणत्या पक्षाचं घरटं आहे? भिडे मास्तरांची ‘लेक’ हेअरस्टाईलमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 06:28 PM2021-12-22T18:28:35+5:302021-12-22T18:29:03+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील जुनी सोनू अर्थात ही भूमिका साकारणारी निधी भानुशाली (Nidhi Bhanushali)  सध्या जाम चर्चेत आहे.

taarak mehta ka ooltah chashmah old sonu aka nidhi bhanushali get troll for her-look | अरे हे कोणत्या पक्षाचं घरटं आहे? भिडे मास्तरांची ‘लेक’ हेअरस्टाईलमुळे झाली ट्रोल

अरे हे कोणत्या पक्षाचं घरटं आहे? भिडे मास्तरांची ‘लेक’ हेअरस्टाईलमुळे झाली ट्रोल

googlenewsNext

 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) या मालिकेतील जुनी सोनू अर्थात ही भूमिका साकारणारी निधी भानुशाली (Nidhi Bhanushali)  सध्या जाम चर्चेत आहे. होय, निधीने स्वत:चे ग्लॅमरस, बोल्ड फोटो व्हिडीओ शेअर करण्याचा नुसता धडाकाच लावला आहे. होय, भिडे मास्तरांच्या या ‘पोरी’ने काल आणखी एक फोटो शेअर केला आणि त्यावरून सध्या ती ट्रोल होतेय.

या फोटोत निधीने ब्लॅक टॉप आणि यॅलो पॅन्ट घातलेली आहे. ‘हे सिरी, प्ले करो टशन में... टशन में... टशन में... टशन में...,’ असं कॅप्शन देत निधीने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोतील एक गोष्ट मात्र चाहत्यांना खटकली. होय, निधीच्या केसांच्या जटा अनेकांना नेमक्या खटकल्या.

होय, निधीने तिच्या केसांच्या जटा केल्या आहेत. यावरून अनेकजण तिला ट्रोल करत आहेत. अरे हे कोणत्या पक्षाचं घरटं आहे, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने तिला, शिस्तीत राहा? असा सल्ला दिला आहे. अर्थात निधीच्या लुकची तारीफ करणारेही असंख्य आहेत.

 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आत्माराम तुकाराम भिडे यांच्या मुलीची भूमिका निधीने साकारली होती. अनेक वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर गेल्यावर्षी तिने ही भूमिका सोडली होती.

अभ्यासाला वेळ देता यावा म्हणून तिने ही मालिका सोडली होती. आता तिच्याजागी पलक सिंधवानी सोनूची भूमिका साकारते आहे. निधी ह्यतारक मेहता का उल्टा चष्माह्णमधून बाद झाली पण सोशल मीडियावर मात्र ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.  
सर्वप्रथम सोनूची भूमिका झील मेहताने साकारली होती. 9 वर्षांच्या वयापासूनच झीलने या मालिकेत काम करणे सुरु केले होते. पण तिनेही अभ्यासासाठी ही मालिका सोडली होती. तिच्या नंतर तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये निधी भानूशालीची एन्ट्री झाली होती. निधी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. इन्स्टावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत.

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah old sonu aka nidhi bhanushali get troll for her-look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.