फक्त दयाबेनच नाही तर 'ही' अभिनेत्री देखील मालिकेतून आहे गायब, जाणून घ्या मालिका सोडल्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 05:29 PM2021-02-18T17:29:20+5:302021-02-18T17:31:50+5:30

इतकेच नाही तर दया बेनला पुन्हा मालिकेत आणण्यासाठी निर्माते प्रचंड प्रयत्न करत आहेत. मात्र यादरम्यान तिने मेकर्ससमोर काही अटी ठेवल्याची चर्चा रंगली होती.

taarak mehta ka ooltah chashmah not dayaben aka disha vakani but this actress also not seen in Show for many months have a look | फक्त दयाबेनच नाही तर 'ही' अभिनेत्री देखील मालिकेतून आहे गायब, जाणून घ्या मालिका सोडल्याचे कारण

फक्त दयाबेनच नाही तर 'ही' अभिनेत्री देखील मालिकेतून आहे गायब, जाणून घ्या मालिका सोडल्याचे कारण

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' सध्या त्याच्या ट्विस्टमुळे नाही तर कलाकारांमुळेच जास्त चर्चेत आहे. या मालिकेमुळे अनेक कलाकारांना नवीन ओळख  मिळाली. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.

 मालिकेती प्रत्येक पात्र आज चाहत्यांचे पसंतीचे आहेत. त्यामुळे आवडत्या कलाकार दिसत नसल्यामुळे रसिकांचाही काहीसा हिरमोड होतो. गेल्या अडीच वर्षांपासून शोमध्ये महत्वाची भूमिका निभावणारी दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी दिसत नाही. दयाबेन पुन्हा परतावी अशी चाहत्यांची ईच्छा आहे. मात्र लग्नानंतर आणि मुलीच्या जन्मानंतर दिशाच्या कौटुंबिक जबाबदा-याही वाढल्या आहे. मुलीला सोडून मालिकेत काम करणे तिच्यासाठी शक्य नसल्यामुळे ती मालिकेतून गायब आहे. 

इतकेच नाही तर दया बेनला पुन्हा मालिकेत आणण्यासाठी निर्माते प्रचंड प्रयत्न करत आहेत. मात्र यादरम्यान तिने मेकर्ससमोर काही अटी ठेवल्याची चर्चा रंगली होती. या अटी निर्मात्यांनी अमान्य केल्याचेही मानले गेले होते. दिशाने काम करू नये, अशी तिचा पती मयूर पांडेची इच्छा असल्याचीही चर्चा होती.

मात्र दयाबेन प्रमाणे आणखीन एका अभिनेत्रीचे काही वर्षापासून मालिकेत दर्शन घडलेले नाहीय. ती दुसरी तिसरी कोणी नसून  ती आहे रीटा रिपोर्टर म्हणजेच प्रिया आहुजा. प्रिया आहूजाचे शोचे मुख्य दिग्दर्शक मालव राजादाशी लग्न झाले आहे.याच मालिकेच्या सेटवर त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. 2008 प्रियाने मालिकेत एंट्री केली होती. अखेर  २०११ मध्ये दोघांचे लग्न झाले.

 

लग्नाच्या तब्बल 8 वर्षानंतर प्रियाने मुलाला जन्म दिला. त्यामुळे ते देखील पूर्णवेळ तिच्या बाळाला सांभाळण्यात बिझी असल्यामुळे मालिकेतून तिने एक्झिट घेतली होती. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत रिटा प्रेक्षकांना खूपच कमी भागांत पाहायला मिळत असली तरी प्रेक्षकांची ती प्रचंड लाडकी आहे. 

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah not dayaben aka disha vakani but this actress also not seen in Show for many months have a look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.