नट्टू काकांना तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील या सदस्याची येतेय आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 11:36 AM2021-01-20T11:36:48+5:302021-01-20T11:37:52+5:30

नट्टू काका या मालिकेतील एका सदस्याला सेटवर प्रचंड मिस करत आहेत असे त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आाहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: Dayaben is Missed on Sets, Nattu Kaka Speaks About Disha Vakani | नट्टू काकांना तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील या सदस्याची येतेय आठवण

नट्टू काकांना तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील या सदस्याची येतेय आठवण

googlenewsNext
ठळक मुद्देआम्ही सगळेच सेटवर दिशाला प्रचंड मिस करत आहोत. ती मालिकेत परत कधी येणार याची आम्ही सगळे वाट पाहात आहोत.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत जेठालालच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाची देखभाल नट्टू काका आणि बाघा अनेक वर्षांपासून करत आहेत. हे दोघे या दुकानाचे आधारस्तंभ आहेत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. नट्टू काका तर हे दुकान सुरू झाल्यापासूनच या दुकानात काम करत आहेत. ही भूमिका घनश्याम नायक साकारत असून त्यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एक सर्जरी करण्यात आली होती. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून चित्रीकरण करत नव्हते. पण आता त्यांची तब्येत सुधारली असून त्यांनी पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. 

नट्टू काका या मालिकेत परतल्यामुळे या मालिकेचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. नट्टू काका या मालिकेतील एका सदस्याला सेटवर प्रचंड मिस करत आहेत असे त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आाहे. घनश्याम यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्ही सगळेच सेटवर दिशाला प्रचंड मिस करत आहोत. ती मालिकेत परत कधी येणार याची आम्ही सगळे वाट पाहात आहोत. तिला मालिकेत परतायचे असल्याचे तिने निर्मात्यांना कळवावे आणि निर्माते त्यावर निर्णय घेतीलच. 

घनश्याम नायक यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांना खरी लोकप्रियता ही तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळेच मिळाली. या मालिकेतील नट्टू काका हे पात्र प्रचंड प्रसिद्ध आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका होती. पण त्यांच्या पहिल्याच मालिकेने त्यांना खूप फेमस बनवले. आज जेठालाल, दया, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक मेहता, अंजली, अय्यर, बबिता, टप्पू, पोपटलाल, नट्टू काका या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: Dayaben is Missed on Sets, Nattu Kaka Speaks About Disha Vakani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.