OMG! तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीने केले आहे बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:06 PM2019-05-30T18:06:37+5:302019-05-30T18:11:05+5:30

दिशा वाकानी म्हणजेच तुमच्या लाडक्या दयाबेनने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले होते असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल का... पण हो, हे खरे आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben aka Disha Vakani acted in Kamsin: The Untouched movie | OMG! तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीने केले आहे बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम

OMG! तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकानीने केले आहे बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम

googlenewsNext
ठळक मुद्देदिशाने कमसिनः द अन टच या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाची नायिका दिशा असून या चित्रपटात तिने काही बोल्ड दृश्य देखील दिले होते. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी या मालिकेत कधी परतणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या मालिकेमुळे दिशाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर आहे. दिशाने या मालिकेसाठी पुन्हा चित्रीकरण सुरू केले असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. पण त्याबाबत दिशा किंवा या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी काहीही न बोलणेच पंसत केले होते. 

दिशाच्या परतण्याबाबत असित कुमार मोदी यांनी एका वृत्तवाहिनीशी काही दिवसांपूर्वी बोलताना सांगितले होते की, दया या मालिकेत परत कधी येईल याची सगळेजण आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यामुळे ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. दिशा परत येण्याची शक्यता खूपच जास्त आहे. पण त्याचसोबत आम्ही काही अभिनेत्रींशी देखील या भूमिकेबाबत चर्चा करत आहोत.

दिशा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात असली तरी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या आधी तिला तितकेसे फॅन फॉलोव्हिंग नव्हते. दिशा वाकानीने कमसिन या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने फूल और आग, देवदास, मंगल पांडे, जोधा अकबर, लव्ह स्टोरी 2050 या चित्रपटांमध्ये खूपच छोट्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच खिचडी, आहट या मालिकांमध्ये केवळ एका भागांसाठी आपल्याला तिला पाहायला मिळाले होते. 

दिशा वाकानी म्हणजेच तुमच्या लाडक्या दयाबेनने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले होते असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल का... पण हो, हे खरे आहे. दिशाने कमसिनः द अन टच या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट एक बी ग्रेड सिनेमा होता. 1997 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित सुर्यवंशीने केले असून दिशासोबत पृथ्वी, शिवा रिंदानी यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची नायिका दिशा असून या चित्रपटात तिने काही बोल्ड दृश्य देखील दिले होते. 

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben aka Disha Vakani acted in Kamsin: The Untouched movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.