Disha Vakani: दुसऱ्यांदा आई झाली 'दयाबेन', अभिनेत्री दिशा वाकानीच्या घरी 'टप्पू'चे आगमन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 19:00 IST2022-05-24T18:55:49+5:302022-05-24T19:00:38+5:30
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' दयाबेन म्हणजेच दिशा वाकानीने एका मुलाला जन्म दिला आहे.

Disha Vakani: दुसऱ्यांदा आई झाली 'दयाबेन', अभिनेत्री दिशा वाकानीच्या घरी 'टप्पू'चे आगमन...
Disha Vakani : तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेनची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दिशा वाकानी दुसऱ्यांदा आई झाली आहे. 2017 मध्ये दिशाने एका मुलीला जन्म दिला होता, त्यानंतर आता तिने एका मुलाला जन्म दिला आहे. या वृत्ताला खुद्द तिचा भाऊ मयूर वाकाणी यांने दुजोरा दिला आहे. मामा झालेल्या मयूर वाकाणी यांच्याही आनंदाला पारावार उरला नसून यावेळी संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
काय म्हणाला मयूर वाकाणी?
तारक मेहता शोमध्ये मयूर वाकाणी दयाबेनचा भाऊ सुंदरलाल याची भूमिका साकारतो. मयूर आता दुसऱ्यांदा मामा बनल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना मयूर वाकाणी यांने सांगितले की, तो दुसऱ्यांदा मामा झाल्याने खूप आनंदात आहे.
दिशा वाकाणी शोमध्ये परतणार का?
अलीकडेच शोचे निर्माते असित मोदी यांनी एका मुलाखतीत पुष्टी केली होती की, दयाबेनचे पात्र यावर्षी शोमध्ये परत येईल. पण, या पात्रात दिशा वाकाणी दिसेल की, नाही याबाबत संशय होता. पण, आता दिशाने एका मुलाला जन्म दिल्यामुळे, ती या शोमध्ये सध्यातरी परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत शोमध्ये तिची जागा दुसरा कुणी घेऊ शकतं. 2017 पासून दिशा मॅटर्निटी ब्रेकवर असून, प्रेक्षक तिची आतुरतेने वाट पाहत आहेत.