का म्हटले जाते स्वप्निलला स्टाइल आयकॉन ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 13:54 IST2016-10-28T13:54:07+5:302016-10-28T13:54:07+5:30

वेगवेगळ्या रिअॅलिटी शोमध्ये सुत्रसंचालन करणारे कलाकार आपण पाहतो. नेहमी वेगवेगळ्या हटके लुकमध्ये ते आपल्याला सुत्रसंचालन करताना दिसतात. त्यांची सुत्रसंचालन ...

Swapnila Style Icon? | का म्हटले जाते स्वप्निलला स्टाइल आयकॉन ?

का म्हटले जाते स्वप्निलला स्टाइल आयकॉन ?

गवेगळ्या रिअॅलिटी शोमध्ये सुत्रसंचालन करणारे कलाकार आपण पाहतो. नेहमी वेगवेगळ्या हटके लुकमध्ये ते आपल्याला सुत्रसंचालन करताना दिसतात. त्यांची सुत्रसंचालन करण्याच्या स्टाइल जितकी निराळी तितकीच त्यांची ड्रेसिंग स्टाइलही निराळी असते. वेगवेगळ्या गेटअपमध्ये ते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत कार्यक्रमात रंग भरण्याचे काम करतात. चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी 'कोण होईल मराठी करोडपती'च्या निमित्ताने सुत्रसंचालन करतोय. एरव्ही त्याला आपण सिनेमा आणि मालिकेत वेगवेगळ्या भूमिकेत पाहिले होते. स्वप्निलची लोकप्रियता पाहता त्याचे चाहते त्याचे स्टाइल फॉलो करतांना दिसतात.'कोण होईल मराठी करोडपती' कार्यक्रमातही त्याचे वेगवेगळे हटक्या लुकचीही जोरदार चर्चा तर होत आहे. आता पर्यंत प्रसारित झालेल्या भागात स्वप्निलने वेगवेगळे रंगाचे ब्लेझर घातले तर, कधी पारंपारिक लुकमध्ये तो या मंचावर अवतरला. त्याची पत्येक अदा ठरली खास. स्वप्निलची प्रत्येक गोष्ट रसिकांची पसंती मिळवतांना दिसते आहे. विशेष म्हणजे स्वप्निल जोशी इतक्या वेगवेगळ्या ड्रेसिंग लुकमध्ये सुत्रसंचालन करणारा पहिला अभिनेता ठरला आहे. 



Web Title: Swapnila Style Icon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.