स्वानंदीही गाजविते रंगभूमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 12:12 IST2016-05-14T06:39:51+5:302016-05-14T12:12:00+5:30
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून मीनू म्हणजेच स्वानंदी टिकेकरने आपल्या दादागिरी स्टाइलने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्यामुळे साहजिकच ...
.jpg)
स्वानंदीही गाजविते रंगभूमी
द ल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून मीनू म्हणजेच स्वानंदी टिकेकरने आपल्या दादागिरी स्टाइलने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्यामुळे साहजिकच मीनू मालिकेनंतर काय करते हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला असणार? तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी लोकमत सीएनएक्सने स्वानंदीशी संवाद साधला असता, ती म्हणाली सध्या मी गोष्ट एका काळाची, काळया पांढºया पदडयाची हे नाटक करत आहे. या नाटकाच्या प्रयोगासाठी आॅस्ट्रेलिया, अमेरिका, सिंगापूरचे दौरे चालू आहेत. हे नाटक मराठी जुन्या गाण्यांवर आधारित आहे. या नाटकाला आपण संगीतमय नाटयनुभव ही म्हणू शकतो. या नाटकात माझ्यासोबत अभिनेता राहूल सोलापूरकर आहेत. हे नाटक आशय वाळिंबे यांनी दिग्दर्शन केले असून, निर्माते मिलिंद ओक आहेत. आपण नवीन असून ही जुन्या रूढी परंपरांचा कसा रिसपेक्ट करतो यावर आधारित हे नाटक आहे.चला, तर स्वानंदी ही सहकलाकर सुव्रत जोशी, पुष्कराज चिरपुट, अमेय वाघ यांच्या पावलावर पाऊल ठेवत रंगभूमीवर धम्माल करत आहे.