स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीचं गृहस्वप्न साकार, फोटो शेअर करत दिली खुशखबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:53 IST2025-01-30T15:52:22+5:302025-01-30T15:53:21+5:30

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni : स्वानंदी टिकेकरने आणि तिचा नवरा आणि गायक आशिष कुलकर्णीने त्यांच्या चाहत्यांना खुशखबरी दिली आहे. त्यांचे घर घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे.

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni's dream of owning a house came true, they shared the good news by sharing photos | स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीचं गृहस्वप्न साकार, फोटो शेअर करत दिली खुशखबरी

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीचं गृहस्वप्न साकार, फोटो शेअर करत दिली खुशखबरी

'दिल दोस्ती दुनियादारी'या मालिकेतून अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) घराघरात पोहचली. सध्या ती कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसत नाही. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतेच तिने आणि तिचा नवरा आणि गायक आशिष कुलकर्णी(Ashish Kulkarni)ने त्यांच्या चाहत्यांना खुशखबरी दिली आहे. त्यांचे घर घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे. 

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीने सोशल मीडियावर फ्लॅटचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यातील पहिल्या फोटोत स्वानंदी आणि आशिष एकमेकांकडे पाहताना दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोत ते दोघे एकमेकांचे अभिनंदन करताना दिसत आहे. त्यांनी फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये घराचा इमोजी शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकरी अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.   


स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीने डिसेंबर, २०२३मध्ये लग्नगाठ बांधली. ते दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. आशिषला 'इंडियन आयडॉल १२'मधून लोकप्रियता मिळवली आहे. आशिष कुलकर्णी हा गायक असून देशविदेशात तो त्याच्या गाण्याचे कार्यक्रम करतो. याशिवाय मराठी चित्रपटातील गाणीही त्याने गायलीत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत आशिषने स्वतःची ओळख बनवली आहे. आशिष उत्तम गायक आहेच पण स्वानंदीलाही आईकडून गाण्याचा वारसा मिळालाय. स्वानंदी गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. आभाळमाया या मालिकेत तिने बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. झी मराठीच्या अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेतून सुकन्या कुलकर्णी यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकली होती. तिने काही रिएलिटी शोजचे सूत्रसंचालन करताना दिसते.
 

Web Title: Swanandi Tikekar and Ashish Kulkarni's dream of owning a house came true, they shared the good news by sharing photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.