'आदिशक्ती'मध्ये दिसणार सुयश टिळक आणि पल्लवी पाटील, ६ मेपासून मालिका भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 11:53 AM2024-04-26T11:53:42+5:302024-04-26T11:54:19+5:30

Aadishakti Serial : ‘आदिशक्ती' मालिकेचा नवा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये अभिनेता सुयश टिळक महत्त्वाच्या भूमिकेत दिसतो आहे. त्याच्यासोबत या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Suyash Tilak and Pallavi Patil, who will be seen in 'Adishakti', will hit the series from May 6 | 'आदिशक्ती'मध्ये दिसणार सुयश टिळक आणि पल्लवी पाटील, ६ मेपासून मालिका भेटीला

'आदिशक्ती'मध्ये दिसणार सुयश टिळक आणि पल्लवी पाटील, ६ मेपासून मालिका भेटीला

सन मराठी वाहिनीवर लवकरच 'आदिशक्ती' (AadiShakti Serial) ही नवीन मालिका दाखल होणार आहे. नुकताच ‘आदिशक्ती' मालिकेचा नवा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) महत्त्वाच्या भूमिकेत दिसतो आहे. त्याच्यासोबत या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील (Pallavi Patil) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

कोण कोणाच्या विरोधात उभं राहिल, कोण कोणाचा शत्रु बनेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही आणि वडीलांची शत्रु स्वत: त्यांची मुलगी असेल तर काय... भितीने थरकाप उडेल अशी घटना चिमुकल्या जीवाशी घडणार असेल तर आईचं काळीज घाबरणारच... पण आई लेकीच्या संरक्षणासाठी आदिशक्तीकडे प्रार्थना करणार आणि तिच्या पाठीशी उभी राहणार दैवी शक्ती, हे या प्रोमोमधून दाखवण्यात आले आहे.


 
दैवी शक्ती नेहमी चांगल्या कर्माच्या, माणसांच्या पाठीशी उभी असते हे या मालिकेतून अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच सुयश टिळक, पल्लवी पाटील, सावी केळकर, अंबरिश देशपांडे, सुश्रुत आदी कलाकारांचा अभिनय अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळतेय. ‘आदिशक्ती’ येत्या ६ मे पासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता फक्त सन मराठीवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Suyash Tilak and Pallavi Patil, who will be seen in 'Adishakti', will hit the series from May 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.