सुशांत छोट्या पडद्यावर परतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 16:57 IST2016-09-20T11:27:56+5:302016-09-20T16:57:56+5:30
पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे सुशांत सिंग रजपूतने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यामुळे त्याच्यासाठी छोटा पडदा हा खूप स्पेशल ...

सुशांत छोट्या पडद्यावर परतला
प ित्र रिश्ता या मालिकेद्वारे सुशांत सिंग रजपूतने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यामुळे त्याच्यासाठी छोटा पडदा हा खूप स्पेशल आहे. सुशांत नुकताच एम एस धोनी या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कुमकुम भाग्य या मालिकेच्या सेटवर पोहोचला होता. या मालिकेच्या सेटवर गेल्यानंतर आपल्या घरी परत आल्यासारखे वाटले असे तो सांगतो. विशेष म्हणजे कुमकुम भाग्य या मालिकेचे प्रोडक्शन बालाजी टेलिफ्लिम्सचे आहे आणि पवित्र रिश्ता ही मालिकादेखील त्यांचीच होती. तसेच या मालिकेचे चित्रीकरण पवित्र रिश्ताच्याच स्टुडिओमध्ये होत असल्याने या मालिकेतील स्पॉट दादा, मेकअपमन, कॅमेरामन यांना सगळ्यांना भेटल्यावर त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शब्बीर आहुवालिया आणि सुशांत हे दोघे खूप चांगले मित्र असल्याने त्या दोघांनी सेटवर खूप गप्पा मारल्या तसेच ते दोघे क्रिकेटदेखील खेळले.