​सुनील ग्रोव्हरने कपिल शर्मासोबतच्या भांडणाचा केला लोकमतकडे खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2017 08:55 AM2017-03-21T08:55:19+5:302017-03-21T14:25:19+5:30

सुनील ग्रोव्हरने लोकमत वुमन समिट 2017मध्ये प्रमुख पाहुणा म्हणून नुकतीच उपस्थिती लावली होती. सुनील ग्रोव्हर सध्या कपिलसोबत झालेल्या भांडणाबाबत ...

Sunil Grover conflicts with Kapil Sharma | ​सुनील ग्रोव्हरने कपिल शर्मासोबतच्या भांडणाचा केला लोकमतकडे खुलासा

​सुनील ग्रोव्हरने कपिल शर्मासोबतच्या भांडणाचा केला लोकमतकडे खुलासा

googlenewsNext
नील ग्रोव्हरने लोकमत वुमन समिट 2017मध्ये प्रमुख पाहुणा म्हणून नुकतीच उपस्थिती लावली होती. सुनील ग्रोव्हर सध्या कपिलसोबत झालेल्या भांडणाबाबत प्रचंड चर्चेत आहे. याबाबत लोकमत वुमन समिट या कार्यक्रमात लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी सुनीलला विचारले असता त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. तो सांगतो, "कपिल आणि माझे भांडण होण्यामागे एक ठरावीक कारण होते. तो एका महिलेसोबत गैरवर्तन करत असल्याने आमच्यात वादाला सुरुवात झाली. मी मध्यस्ती केल्याने तो माझ्यासोबत अतिशय असभ्य शब्दांत बोलला. कपिलने महिलेशी गैरवर्तणूक करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. पण कपिलची वागणूक मला अजिबात न पटल्याने मी कपिलला त्याबाबत बोललो. त्यानंतर कपिल माझ्याशी खूप वाईट वागला. या घडलेल्या प्रकरणानंतर पुन्हा द कपिल शर्मा शोमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही."
सिडनीत शो करण्यासाठी द कपिल शर्मा शोची संपूर्ण टीम गेली होती. भारतात परतत असताना शोची टीम बिझनेस क्लासमधून प्रवास करत असताना कपिल शर्मा चांगलाच नशेत होता. नशेत असताना त्याची आणि सुनीलची बाचाबाची झाली. यानंतर कपिलने सुनीलला शिवीगाळ करत मारहाणदेखील केली होती. तसेच तू माझा नोकर आहेस असेही त्याला तो बोलला होता. 
या वादानंतर सुनीलने फेसबुकला एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, तुझ्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. तू प्राण्यांचा जसा आदर करतोस तसा माणसांचाही करायला शिक असा सल्ला मी नक्कीच तुला देईन. तुझ्यासारखे सगळे टायलेंटेड नसतात. जर सगळेच टायलेंटेड असते तर तुझी किंमत कोणी केली असती का? याचा एकदा तरी विचार कर आणि तुझी चुकीची गोष्ट कोणी सुधारत असेल तर त्याच्याशी असभ्य भाषेत बोलू नकोस. तुझ्यासोबत जे महिला प्रवासी प्रवास करत होत्या, त्यांना तुझ्या स्टारडमशी काहीही घेणे देणे नाहीये. त्यांच्यासमोर असभ्य भाषा वारण्याचे टाळ आणि तू तुझ्या कार्यक्रमातून कोणालाही काढू शकतोस याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. तू तुझ्या क्षेत्रात चांगला आहेस. पण स्वतःला देव समजू नकोस. तुझ्या यशासाठी तुला शुभेच्छा. 



Web Title: Sunil Grover conflicts with Kapil Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.